ETV Bharat / city

अजूनही माणूसकी जिवंत; डॉक्टरांच्या पुढाकाराने केले जातात कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार - अमरावती लेटेस्ट

कोरोनाच्या भयावह काळात सख्या नातेवाईकांनी अंत्यसंस्काराला पाठ फिरवली आहे. परंतु कोरोना मृतकांच्या मृतदेहावर डॉक्टरांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार केले जात आहेत, त्यामुळे अजूनही माणूसकी जिवंत असल्याचे दिसत आहे.

डॉक्टरांच्या पुढाकाराने केले जातात कोरोना मृतकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

author img

By

Published : May 18, 2021, 11:44 AM IST

अमरावती : कोरोनामुळे देशात दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अगदी रक्ताचे नातेवाईकसुद्धा आपल्या आप्तस्वकीयांच्या अंत्यसंस्कारासाठी पाठ फिरावतानाचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे माणूसकी ओशाळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, कोरोनाच्या या भयावह काळात नातेवाईकांनी अंत्यसंस्काराला पाठ फिरवली असली, तरी अनेक सामजिक कार्यकर्ते मात्र सेवाभावी वृत्तीने काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील काही देवमानसांनी पुढाकार घेत "माणुसकी संघ" नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

डॉक्टरांच्या पुढाकाराने केले जातात कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार

स्वखर्चातून आजपर्यंत दहा-बारा रुग्णांचे विधिवत अंत्यसंस्कार पाडले पार

दर्यापूर येथील एकता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर इकबाल पठाण यांच्या नेतृत्वात तालुक्यातील काही युवकांनी एकत्र येत "माणुसकी संघ" नावाने एक चमू तयार केला आहे. तालुक्यात कोठेही कोरोनाने मृत व्यक्तीचा विधिवत अंत्यसंस्कार करून, सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी संपूर्ण जिल्ह्यासमोर ठेवले आहे. कोरोनाच्या भीतीने मृतदेहाच्या जवळसुद्धा कुणीही जायला तयार नाही. परंतु या तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सूरु केलेल्या या उपक्रमांची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. या उपक्रमाद्वारे स्वखर्चातून आजपर्यंत दहा-बारा रुग्णांचे विधिवत अंत्यसंस्कार पार पाडले आहेत.

हे काम सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प

कोरोनाने दररोज होणारे मृत्यू पाहता, हे काम सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प या युवकांनी घेतला आहे. हा उपक्रम एकता हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर इकबाल पठाण यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील सुधीर पवार, गणेश साखरे, प्रवीण बायस्कार, अंकुश कावडकर, संतोष चौखंडे, मंगेश हावरे, सचिन गवई, शुभम आठवले, श्रीकांत पडघामोळ, अनिल बर्वे, महेंद्र खरे हे युवक राबवित आहेत.

हेही वाचा - यूपी सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यांची 'ईटीव्ही भारत'कडून पोलखोल..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.