ETV Bharat / city

Amravati Development Stalled : एकाच घरात आमदार-खासदार, तरीही.. माजी खासदार अनंत गुढे यांनी राणा कुटुंबावर साधला निशाणा - Ex MP Anant Gudhe on Rana Couple

एकाच घरात आमदार खासदार असून सुद्धा जिल्ह्याचा विकास मात्र पूर्ण थंडावला (Development stalled in Amravati District) आहे. सरकार सत्तेतून तीन महिने झाले; पण तरी अजूनही जिल्ह्याला पालक (Amravati District Guardian Minister) म्हणून मिळाला नाही. पालकमंत्र्याअभावी जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असल्याची टीका माजी खासदार अनंत गुढे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत येऊन उणेपुरे दोन महिने झालेत. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारासह पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने अमरावती जिल्ह्यात विकास कामांना ब्रेक (Amravati Ex MP Anant Gudhe) लागल्याचे चित्र आहे.

पालकमंत्र्याअभावी जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असल्याची टीका; माजी खासदार अनंत गुढे

author img

By

Published : Sep 25, 2022, 4:21 PM IST

अमरावती : एकाच घरात आमदार खासदार असून सुद्धा जिल्ह्याचा विकास मात्र पूर्ण थंडावला (Development stalled in Amravati District) आहे. सरकार सत्तेतून तीन महिने झाले; पण तरी अजूनही जिल्ह्याला पालक (Amravati District Guardian Minister) म्हणून मिळाला नाही. पालकमंत्र्याअभावी जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असल्याची टीका माजी खासदार अनंत गुढे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत येऊन उणेपुरे दोन महिने झालेत. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारासह पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने अमरावती जिल्ह्यात विकास कामांना ब्रेक (Amravati Ex MP Anant Gudhe) लागल्याचे चित्र आहे. पालकमंत्र्याच्या नियुक्ती अभावी कोट्यावधी रुपयांचे विकास कामे ठप्प झाल्याचे पाहायला मिळते आहे.

पालकमंत्री देता का कुणी?
नियोजन विभाग, जिल्हा परिषद अशा कुठल्याही विभागात गेले तरी पालकमंत्री नसल्यामुळे सगळं थांबलं आहे. हीच ओरड सगळीकडे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे कोणी पालकमंत्री देता का आम्हाला, असे म्हणायची वेळ जिल्ह्यावासियांवर येऊन ठेपली आहे. एकदाचा जिल्ह्याला पालकमंत्री द्या अन विकासाची गाडी सुसाट पळवू द्या, अशी आर्त जिल्हावासीयांनी लावून धरली आहे.

पालकमंत्र्याअभावी कामांना स्थगिती - जिल्ह्याचा २०२२- २३ या वार्षिक योजनेसाठी ३५० कोटींचा आराखडा आहे. आदिवासी क्षेत्रासाठीच्या विकासाकरिता ९५ कोटी ५५ लाख आणि समाज कल्याण विभागाच्या योजनांसाठी सुमारे १०१.२०कोटींचे नियोजन तयार आहे. परंतु या सगळ्या आराखड्यातील बहुतांश कामावर स्थगिती दिली आहे त्यामुळे केवळ जुनी कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

पालकमंत्र्याअभावी जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असल्याची टीका; माजी खासदार अनंत गुढे

पालकमत्र्यांअभावी घरकुल यादी रखडली - मागासवर्गीय घटकांसाठी रमाई आवास योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ दिल्या जातो; परंतु तब्बल तीन महिन्यांपासून जिल्ह्याला उद्दिष्ट प्राप्त असलेल्या सुमारे १३३० घरकुलाची मंजुरात पालकमंत्र्यांच्या नियुक्ती अभावी रखडली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापावेतो यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. प्रशासनाला याचे अधिकार नाही का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.