ETV Bharat / city

Firing In Amravati अमरावतीत दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात शाळकरी विद्यार्थिनी जखमी - अमरावतीत गोळीबार मराठी बातमी

अमरावती शहरात गोळीबार झाला firing In amravati आहे. या गोळीबारत 13 वर्षीय विद्यार्थिनी जखमी झाली आहे.

firing In amravati
firing In amravati
author img

By

Published : Aug 12, 2022, 7:04 PM IST

Updated : Aug 12, 2022, 8:15 PM IST

अमरावती - अमरावती शहरात पठाण चौक परिसरालगत असणाऱ्या चारा बाजार परिसरात दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार झाला. या गोळीबारात तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे अमरावती शहर पुन्हा एकदा हादरले Firing In Amravati आहे.

गोळीबार झाल्यानंतर नागरिकांची प्रतिक्रिया

दोन गटात वाद कोणत्यातरी कारणाने चारा बाजार परिसरात दोन युवकांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन गट समोरासमोर आले. तेव्हा जुबेर सलीम पठाण या युवकावर काही लोकांनी तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभारी जखमी झाला. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील अनेक जण रस्त्यावर उतरले होते.

शाळा परिसरालगत गोळीबार दोन गटात हाणामारी सुरू झाली असताना एका व्यक्तीने यावेळी गोळीबार केला. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास या परिसरात असणारी उर्दू असोसिएशन स्कूल सुटल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी या परिसरात होती. यावेळी झालेल्या गोळीबारात शाळेतून घराकडे जात असलेल्या तेरा वर्षीय चिमुकलीच्या पायाला गोळी लागली. या गोळीबारात ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.

सावदेकर रुग्णालयासमोर गर्दी गोळीबारात जखमी झालेल्या शाळकरी चिमुकलीला रुक्मिणी नगर परिसरातील डॉक्टर सावदेकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सावदेकर रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी उसळली असून, या ठिकाणी पोलीसांचा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त घटनास्थळी या घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. गोळीबारात चिमुकली जखमी झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त आरती पठाण चौक परिसरात दाखल झाल्या. या परिसरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा - Shinde Group ठाकरेंना आणखी एक धक्का शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रतिशिवसेना भवन

Last Updated : Aug 12, 2022, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.