ETV Bharat / city

Amravati Hospital Fire :अमरावतीत बाल रुग्णालयाला आग; मेडिकल स्टोअरचे मोठे नुकसान

अग्रवाल बाल रुग्णालयाला मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्यामुळे खळबळ उडाली. या रुग्णालयात सुदैवाने एकही बाळ दाखल झाले नव्हते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. ही आग रात्री अकरा वाजेपर्यंत आटोक्यात आली होती. या आगीमुळे ( Amravati Hospital Fire ) नेमके किती नुकसान झाले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

अमरावती
Amravati
author img

By

Published : Dec 29, 2021, 9:20 AM IST

अमरावती - शहरातील भूतेश्वर चौक परिसरात स्थित डॉक्टर अग्रवाल बाल रुग्णालयाला ( Amravati Hospital Fire ) मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्यामुळे खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एकूण सात बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या रुग्णालयात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.

अमरावतीत बाल रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरला आग

भुतेश्वर चौक परिसरात डॉ. सतीश अग्रवाल यांचे बाल रुग्णालय आहे. रुग्णालयात लागलेल्या आगीत रुग्णालय परिसरातील औषधी केंद्र गोदाम जळून राख झाले आहेत. आग लागताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. परिसरातील नागरिकांनी या विझवण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलही घटनास्थळी धावून आले.

लहान बाळाच्या रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा आपल्या कार्यकर्त्यांसह डॉक्टर सतीश अग्रवाल रुग्णालय परिसरात धावून आल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन शमन विभागाला घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीमुळे हादरलेल्या डॉक्टर सतीश अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांचे यावेळी खासदार नवनीत राणा यांनी सात्वन केले. ही आग रात्री अकरा वाजेपर्यंत आटोक्यात आली होती. या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा - Horoscope 2022 Sagittarius : धनु राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.