ETV Bharat / city

वीज बिल वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका; यशोमती ठाकुरांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक - यशोमती ठाकुरांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक

सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वंसामान्यांपासून ते श्रीमंताना विजेच्या भरमसाठ वीजबिलांचा शॉक देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी करंट दिला आहे.

मंत्री यशोमती ठाकुर
मंत्री यशोमती ठाकुर
author img

By

Published : Jul 30, 2021, 10:40 PM IST

अमरावती - सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वंसामान्यांपासून ते श्रीमंताना विजेच्या भरमसाठ वीजबिलांचा शॉक देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी करंट दिला आहे. शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करताना सहानुभूती दाखवा इंग्रजांसारखं वागू नका आणि ग्राहकांवर दादागिरी करू नका, असा सज्जड दमच मंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिला.

वीज बिल वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका; यशोमती ठाकुरांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक

'वीजबिल वसुली करताना शेतकऱ्यांसोबत इंग्रजासारखे वागू नका'

अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम भरण्याचा तगादा महावीतरणच्या अधिकार्‍यांकडून लावला जातो. तसेच शेतकर्‍यांची वीज जोडणी कापली जाते. अशा अनेक तक्रारी पालक मंत्री ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या याचा पाठपुरावा करताना कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांकडून जी असेल ती रक्कम स्वीकारा ऊर्जा विभागावर ताण येतो आहे. याची माहिती आहे, मात्र वीजबिल वसुली करताना शेतकऱ्यांसोबत इंग्रजासारखे वागू नका शक्य तितक्या साध्या पद्धतीने प्रक्रिया पार पाडा, असा सल्ला यावेळी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिला.

अधिकाऱ्यांच्या कामाबाबत पालकमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान, यावेळी अमरावती विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांचीही मंत्री यशोमती ठाकूर यांनी चांगलीच कान उघाडणी केली. अमरावती विभागीय क्रीडा संकुलात नेमलेल्या प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत परस्पर नेमणुका केल्यामुळे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विभागीय क्रीडा संकुल यामध्ये कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा असू नये, तसेच खेळांमध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण आणू नये, अशा पद्धतीचा सूचना आणि आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले आहेत. अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार न करता खेळाच्या आणि खेळाडूंच्या हिताचा विचार करून विभागीय संकुलामध्ये कारभार करावा अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही ठाकूर यांनी यावेळी दिला. अधिकारी जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांनाही न जुमानता कारभार करीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा - मी पॅकेज देणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री; महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याबाबत विचार - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.