ETV Bharat / city

शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून मदत देणे गरजेचे - बच्चू कडू - महाराष्ट्र पाऊस बातमी

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

bacchu kadu
बच्चू कडू
author img

By

Published : Oct 2, 2021, 2:33 PM IST

अमरावती - संततधार पावसामुळे विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. सोयाबीन, कापूस, तूर आदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

पिकांचे पंचनामे करून मदत देणे गरजेचे
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाविषयी राज्यभरातून शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आल्याचेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. 65 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पंचनाम्याचे आदेश दिले जात नाही. परंतु, मागील आठ दिवसात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पंचनाम्याचे आदेश द्यायलाही हरकत नाही, असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहे. काढणीच्या वेळेस सोयाबीन पिकांचांही पावसाचा फटका बसला आहे.
याआधीची मदत बाकी
मागील दोन महिन्यांपूर्वी ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांना आतोनात नुकसान सहन करावे लागले होते. आधीच कोरोना आणि आता ढगफुटी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच मागच्या वर्षीचे नुकसान भरपाईही मिळाली नसल्याचे बच्चू कडूंनी सांगितले.

हेही वाचा - धर्मांतरण प्रकरण : उत्तर प्रदेश एटीएसकडून यवतमाळ येथील एकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.