ETV Bharat / city

Marathi Version Of Srivalli Song : तुझी झलक वेगळी श्रीवल्ली... ऐका श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन - Pusha The rise

अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या "पुष्पा द राईज" (Pusha The rise) चित्रपटातील श्रीवल्ली गाणे सोशय मिडीयावर हीट झाले आहे. अमरावतीतील विजय खंडारे या तरुणाने श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन बनवले आहे. आणि तरुणांचा याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

Marathi Version Of Srivalli Song
Marathi Version Of Srivalli Song
author img

By

Published : Jan 11, 2022, 7:15 PM IST

अमरावती : साउथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या "पुष्पा द राईज" या (Pusha The rise) तेलगू चित्रपटाने बॉस ऑफिसवर धमाका उडवून दिला आहे. तेलुगू नंतर हा चित्रपट मल्याळम ,कन्नड,आणि हिंदी या भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात अल्लू अर्जुन (पुष्पा) (Actor Allu Arjun) आणि रश्मीका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. काही आठवड्यातच हा चित्रपट हिट होऊन 250 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

श्रीवल्ली टीमशी बातचीत

चित्रपटा प्रमाणेच चार भाषेत देखील हे गाणं काढण्यात आल आहे.पण आता हिंदी नंतर मराठी भाषेतही हे गाण १२ दिवसांपूर्वी युट्यूब वर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणे अमरावती तिवसा तालुक्यातील निंबोरा गावाच्या विजय खंडारे यांने या "श्रीवल्ली' या मराठी गाण्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे विजय ने स्वतःहा हे गाण तयार केले आहे. त्याने "पुष्पा"चा आणि बायको तृप्ती खंडारेला "श्रीवल्ली"चा रोल देऊन ३ मिनिट 44 सेकंदांचा भन्नाट व्हिडिओ बनवला आहे. हिंदीतील "श्रीवल्ली" या गाण्याचे मराठी व्हर्जन चाहत्यांचा चांगला प्रतिसाद असून १२ दिवसात १० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Marathi Version Of Srivalli Song
श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन
'पुष्पा द राईज'च्या टीमने पाहले विजयचे गाणं'पुष्पा द राईज'
या चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन,अभिनेत्री रश्मीका मंदना तसेच या गाण्याचा मूळ गायक श्रीथ श्रीरावसह चित्रपटाच्या टीमनेही गाणे पाहिले असल्याचे विजय खंडारे याने सांगितलं. या मराठी गाण्याच्या व्हिडिओमध्ये विजय आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी शूटिंग दरम्यान घडलेले किस्से शेअर केले. जेव्हा श्रीवल्लीच्या मागे पुष्पराज मंदिराच्या पायऱ्या उतरत जातो. तेव्हा पायऱ्यावरून पडण्याचा शूट करायचं होतं. परंतु पायऱ्यांवरून पडण्याची भीती वाटत होती. गुपचूप खातानाचे शूट करायच्या वेळेस अनेकदा रिटेक करावा लागला तरी हातातील गुपचूप खाली पडत नव्हतं असे एक ना अनेक किस्से सांगताना विजय आणि तृप्ती ला हसू आवरत नव्हते. विजयला या गाण्याच शुटींग करायला तीन दिवस लागले. दोन तासात त्याने हे गाणं लिहीले आहे.
Marathi Version Of Srivalli Song
पाहा मराठी श्रीवल्ली
कोण आहे युट्यूबर विजय खंडारे..?
युट्युबर प्रसिद्ध असलेला तरुण विजय खंडारे हा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निंभोरा या छोट्या गावात राहतो. विजय अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेला युट्युबर आहे. विजयचे वडील नारायण खंडारे हे हातगाडी वर एक छोटा व्यवसाय करतात. तर त्याची आई गृहिणी आहे. विजयने पदवीधरचे शिक्षण पूर्ण केले असून आधी हमालीचे काम देखील करायचा. परंतू जिद्द आणि कला त्याच्या अंगी आहे .त्यामुळे सोशल मीडियावर काही दिवसातच तो लोकांच्या पसंतीला उतरला आहे..पूर्वी विजय याची टिक टॉक स्टार म्हणून ओळख होती.
Marathi Version Of Srivalli Song
विजय खंडारेने गायले गाणे
व्हिडिओसाठी संपूर्ण कुटुंब विजयच्या सोबतीला
विजय हा त्याची पत्नी तृप्ती खंडारे यांना सोबत घेऊन व्हिडिओ बनवत असतो. चालू घडामोडी, आसपास घडणारे किस्से यावर अभ्यास करून तो नवनवीन व्हिडियो बनवतो. विनोदी व्हीडीयोतून तो आपल्या प्रेक्षकांना खळखळून हसवतो.
Marathi Version Of Srivalli Song
यूट्यूबवर मिळतोय चांगला प्रतिसाद

ना महागडे कपडे, ना कॅमेरा, ना स्टुडिओ
एखाद्या व्हिडिओ बनवायचा असल्यास, त्याला खर्च येतो. व्हिडिओत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार महागडे कपडे परिधान करतात. पण, विजय आणि त्याच्या टीमने कमी खर्चात हे गाणे बनवले आहे. तो आणि त्याच्या पत्नी अगदी साध्या पेहरावात आणि मोबाईल ने शूट करत हे व्हिडिओ बनवतात. कॅमेरामन म्हणून त्याची बहीण आचल खंडारे त्याला मदत करते.

हेही वाचा - PMPL 99 crore rupees Compensation : खासगी ठेकेदारांवर पीएमपीएल मेहरबान, ९९ कोटी रुपयांची कंपन्यांना देणार नुकसाभरपाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.