ETV Bharat / city

Jhund Fame Saurabh Abhyankar : अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करणे स्वप्नवत : 'झुंड' फेम सौरभ अभ्यंकर

author img

By

Published : Mar 15, 2022, 2:33 PM IST

मला माझे करिअर रॅप आणि संगीत क्षेत्रात करायचे असल्याचे झुंड सिनेमा (Jhund Movie) झळकलेल्या अमरावती शहरातील बिच्छू टेकडी परिसरात राहणारा (Jhund Fame Saurabh Abhyankar) सौरभ अभ्यंकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला.

Jhund Fame Saurabh Abhyankar
Jhund Fame Saurabh Abhyankar

अमरावती - माझी आजी, माझी आई,माझे वडील, मी आणि आजच्या पिढीतील प्रत्येक जण ज्यांना ओळखतात त्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत मला सिनेमात काम करायला मिळाले. तसेच नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्यासोबत सिनेमात काम करण्याची मला संधी मिळाली. खरंतर हे एक थक्क करणारे स्वप्नच होते. पुढे योग्य सिनेमा मिळाला तर अभिनय नक्कीच करणार. मात्र मला माझे करिअर रॅप आणि संगीत क्षेत्रात करायचे असल्याचे झुंड सिनेमा झळकलेल्या अमरावती शहरातील बिच्छू टेकडी परिसरात राहणारा सौरभ अभ्यंकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला.

झुंड फोम सौरभ अभ्यंकरशी बातचीत
सहज नागपूरला गेलो आणि मोठी संधी मिळाली
नृत्य आणि रॅप मध्ये करियर करायचे असल्याने मी काही दिवसांपासून मुंबईत स्ट्रगल करतो आहे. मी मुंबईला असताना भाऊ करण आणि आणि मित्र शुभम कळसकर यांची झुंड सिनेमात ऑडिशन साठी निवड झाली होती. मी अचानक अमरावतीला आलो होतो. आणि माझा भावाने ऑडिशनला नागपूरला जाण्यास नकार दिला. यामुळे माझ्या आईने मला मित्र शुभम सोबत नागपूरला जायला सांगितले. शुभम आणि काही मित्रांची ऑडिशन झाली. मी बाहेरच बसलो होतो. मात्र, आतमध्ये गेलेल्या माझ्या मित्रांनी आमच्या सोबत एक मुलगा आला आहे त्याचे पण ऑडिशन घ्या असे आतमध्ये सांगितले. मी त्या हॉलमध्ये गेलो तर माझ्या समोर साक्षात नागराज मंजुळे बसले होते. त्यांना पाहून मी थक्क झालो. नागराज मंजुळे यांनी स्वत:बाबत माहिती द्यायला संगितली. मी रॅप करतो आणि एका पथकासोबत मुंबईत काम करीत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी माझा मोबाईल क्रमांक घेतला. नंतर मी मुंबईला परतल्यावर मला कॉल आला आणि एका वर्कशॉपला बोलावण्यात आले. त्या ठिकाणी साक्षात महानायक अमिताभ बच्चन होते. माझी सिनेमासाठी निवड झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. माझ्यासारख्या विदर्भातील कलाकाराला मोठ्या पडद्यावर संधी मिळते आहे. याचा मला आनंद झाल्याचे सौरव म्हणाला.
संगीत क्षेत्रातच भरारी घ्यायची
माझी आवड आणि छंद हे संगीत आणि नृत्य आहे. लहानपणापासूनच मी नाचायचो. या क्षेत्रात येण्याबाबत ज्यांनी मला प्रेरणा दिली ते भरत मोंढे यांनी अमरावतीत नचबलिये हा डान्स शो घेतला होता. या शो मध्ये मला माझे नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. यानंतर भरत मोंढे सरांशी माझे सूर जुळले. त्यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. त्यांचा सहायक म्हणून नृत्य वर्गात नृत्य शिकवायला लागलो. माझे पहिले रॅप भरतसर यांनाच ऐकविले. येथील ॲनिमेशन कॉलेजमध्ये त्यांनी माझा रॅप रेकॉर्ड करून घेतला. हा रॅप संपूर्ण विदर्भात फेमस झाला. यापुढेही मला संगीत क्षेत्रातच करिअर करायचे आहे. मात्र माझे आदर्श असणारे नागराज मंजुळे यांच्यासोबत विदर्भाच्या विषयावर चित्रपट असल्यास तसे चित्रपटही मला करायला आवडेल असे सौरभ म्हणतो.
तीन तास केवळ सौरभला पाहत होतो
एखाद्या बाळाच्या कौतुकाने आईला जितका आनंद होतो तितकाच आनंद मला झाला, असे सौरभचे नृत्य क्षेत्रातील गुरु भरत मोंढे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना भावना व्यक्त केल्या. पडल्यावर तीन तास केवळ मी सौरभलाच पाहत होतो. सिनेमात सौरभने स्वतः लिहिलेला आणि म्हटलेला रैप पडद्यावर पाहाताण माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले असेही भरत मोंढे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.