अमरावती : पावसामुळे सोयाबीन हातातून गेलं त्यानंतर कपाशीला पाऊस झाल्यावर बोंड अळीने आक्रमण केलं. तुरीच्या पिकांवर दोन पैसे उरतील ही आशा बळीराजाच्या उराशी होती. परंतु तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकर्यांच्या हातावर तूर पिकाने तुरी दिल्या आहे. अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण व हलक्या सरीचा पाऊस झाल्याने तूर पिकावर रोगाचे सावट आले आहे. परिणामी, जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पीक करपले आहे.
Etv Bharat Special - अवकाळी पावसाने तूर पिकाने दिल्या शेतकऱ्यांनच्या हातावर तुरी
या वर्षी कपाशी आणि सोयाबीन हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची मदार तुरीच्या पीकावर होती. सुरुवातीला तूर हिरवीगार व भरदार असल्याने यावर्षी तुरीचे उत्पादन होईल ही आशा त्यांना होती. त्यामुळे शेतकर्यांनी चांगली फवारणी केली. परंतु तीन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे तूरही करपून गेला आहे.
tur crop ruined
अमरावती : पावसामुळे सोयाबीन हातातून गेलं त्यानंतर कपाशीला पाऊस झाल्यावर बोंड अळीने आक्रमण केलं. तुरीच्या पिकांवर दोन पैसे उरतील ही आशा बळीराजाच्या उराशी होती. परंतु तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकर्यांच्या हातावर तूर पिकाने तुरी दिल्या आहे. अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण व हलक्या सरीचा पाऊस झाल्याने तूर पिकावर रोगाचे सावट आले आहे. परिणामी, जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पीक करपले आहे.
याच गावातील गणेश मेहरे यांचीही पण हीच परिस्थिती आहे. गणेश मेहरे यांनी सहा एकर शेतावर यंदा तूर आणि सोयाबीनची लागवड केली होती. कर्ज काढून तूर आणि सोयाबीन ची लागवड केली. परंतु पावसामुळे सोयाबीनही गेले. केवळ सहा एकरात 12 पोती सोयाबीन झाल्याने त्यांचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे, तुरीवर तरी पैसे निघतील ही त्यांची आशा होती.
रात्र जागून केली तुरीची राखणं
तूर उत्पादक शेतकरी दिलीप डोंगरे सांगतात की अडीच एकर शेतावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. तरीसुद्धा आम्ही मोठी मेहनत घेतो. आमच्या परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा मोठा हैदोस आहे. त्यामुळे पीक वन्यप्राणी उदध्वस्त करतील ही भीती आम्हाला होती. शेतातच झोपडी करून मागील दोन महिन्यापासून आमच्या शेतात मुक्काम आहे. अर्ध्या रात्री उठून आम्ही वन्यप्राण्यांना शेताबाहेर काढतो. परंतु आता पीक हाती येणार होते परंतु दव आल्याने मात्र ते हिरावून नेले.अन शेतकऱ्यांना अश्रू झाले अनावर
गणेश मेहरे त्यांची परिस्थिती जेमतेम तरीसुद्धा त्यांनी उधार पैसे आणून आपल्या शेतातील तुरीवर महागडी फवारणी केली पण मात्र दवाळ पिकाने होत्याचं नव्हतं झालं. हे सांगत असतांनाच गणेश मेहरे यांना अश्रू अनावर झाले तळहाताच्या फोडा प्रमाणे तुरीची काळजी घेतली पण तूरही आता निघून गेल्याचे ते सांगतात.