अमरावती - आतापर्यंत सत्तेत असणारे विकासाची मलाई स्वतःच चाखत होते. आज अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेली दहीहंडी स्पर्धेची दहीहंडी ही खऱ्या अर्थाने विकासाची दहीहंडी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी महाराष्ट्रात विकासाची हंडी फोडू आणि या हंडीतील विकासाची मलाई महाराष्ट्रातील प्रत्येक जण चाखेल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis म्हणाले. ते आज अमरावतीत नवाथे चौक येथे आयोजित युवा स्वाभिमान संघटनेच्या दहीहंडी Yuva Swabhiman Dahihandi Amravati उत्सवाला संबोधित करताना बोलत होते.
'आमच्या राज्यात सर्वच गोष्टींचे स्वातंत्र्य' : गेली अडीच वर्ष राज्यात अनेक बंधने होती. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना कारावासात टाकले जायचे. आता मात्र आमच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सन्मान राखल्या जाईल. गेली दोन वर्ष कुठलेही सण उत्सव राज्यात आनंदात साजरे झाले नाही. आता मात्र या दहीहंडी उत्सवाप्रमाणेच गणपती उत्सव त्यानंतर नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी सारे काही प्रत्येकाला अतिशय आनंदात साजरा करता येईल, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'खासदार आमदार आता कमळावरच निवडून येणार' : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेली कुठलीही मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाळत नाहीत. यामुळे अमरावती जिल्ह्याचा झपाट्याने विकास होतो आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे दहीहंडी सोहळ्याला संबोधित करताना म्हणाले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघाचा खासदार हा कमळावरच निवडून येणार आणि बडनेरा मतदारसंघात देखील कमळ हे बोधचिन्ह असणाराच आमदार निवडून येईल, असे बावनकुळे यांनी म्हणाले.
हनुमान व्यायाम प्रसाद मंडळ : 108 वर्षाची परंपरा असलेल्या हनुमान व्यायाम प्रसाद मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा लवकरच देऊ, त्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. श्री हनुमान व्यायाम प्रसाद मंडळ अंतर्गत मेजर ध्यानचंद स्टेडियमचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी विद्यार्थी या संस्थेत येऊन माझ्या स्मृती ताज्या झाल्या आहेत. कारण मी या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. या संस्थेने मला जीवनात खूप काही शिकवले आहे. सर्व प्रकारचे खेळ मी याच ठिकाणी शिकलो पण मात्र मल्लखांब शिकता आला नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अभिनेता गोविंदाने आणली कार्यक्रमात जान : युवा स्वाभिमांच्या दहीहंडी सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे वर्धाचे खासदार रामदास तडस खासदार अनिल बोंडे चांदुर रेल्वेचे आमदार प्रताप अडसळ यांच्यासह अभिनेता गोविंदा देखील उपस्थित होते. अभिनेता गोविंदा यांनी यावेळी आपल्या सिनेमांमधील गाजलेले संवाद आणि नृत्य सादर करून दहीहंडी उत्सव सोहळ्यात जान आणली. अभिनेता गोविंदा यांनी खासदार नवनीत राणा यांच्यासह नृत्य सादर करतात दहीहंडी स्पर्धेसाठी जमलेल्या तरुणाईने मोठा जल्लोष केला.
हेही वाचा - Mp Navneet Rana अजित पवारांच्या आजूबाजूच्या लोकांनी सांभाळून बोलावे, नवनीत राणांचा अमोल मिटकरींना सल्ला