ETV Bharat / city

Dahihandi of Yuva Swabhiman: अमरावतीत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमानची दहीहंडी - Curd of youthful self esteem

युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने 21 ऑगस्ट रोजी अमरावती शहरात नवा ते चौक येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दहीहंडी स्पर्धेसाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 17, 2022, 5:25 PM IST

Updated : Aug 17, 2022, 6:45 PM IST

अमरावती युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने 21 ऑगस्ट रोजी अमरावती शहरात नवा ते चौक येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दहीहंडी स्पर्धेसाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषद

या सिने अभियंत्यांची राहणार उपस्थिती आमदार रवी राणा यांच्या वतीने 2009 पासून अमरावती शहरातील राजापेठ चौक येथे विदर्भाची दहीहंडी या नावाने दरवर्षी दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाते. कोरोनामुळे सलग दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नाही. यावर्षी ही स्पर्धा नवा ते चौक येथे आयोजित करण्यात आली असून या दहीहंडी स्पर्धेला सिने अभिनेता कार्तिक आर्यन ,रविना टंडन, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. परतवाडा शहरात 23 ऑगस्ट आणि धार्मिक शहरात 24 ऑगस्ट रोजी आयोजित दहीहंडी स्पर्धेला सिने अभिनेता शक्ती कपूर उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्र्यांची होणार रक्ततुला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात युवा स्वाभिमान संघटनेच्या दहीहंडी स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 21 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता नवा ते चौक येथे दहीहंडी स्पर्धा स्थळावर रक्त तुला केली जाणार आहे. या रक्तपुलेसाठी युवा स्वाभिमान संघटनेचे शेकडो पदाधिकारी रक्तदान करणार आहेत. भाजपचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रध्वजाला दिली जाणार सलामी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना या वर्षी युवा स्वाभिमान संघटनेच्या दहीहंडी स्पर्धेदरम्यान नवा ते चौक येथे सकाळी सात वाजता राष्ट्रध्वज फडकविला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व संघ दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होण्यापूर्वी राष्ट्रध्वजाला सलामी देणार अशी माहिती युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष जितू दुधाने यांनी दिली.

हेही वाचा - Aurangabad Crime औरंगाबादमध्ये प्रियकरकाडून प्रियसीची गळा चिरून हत्या

Last Updated : Aug 17, 2022, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.