ETV Bharat / city

कोरोना काळातही आई-वडिलांचा विसर.. संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाचा मिळाला 'आधार' - संत गाडगेबाबा वृद्धाश्रम अमरावती

संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्यावतीने अमरावती जिल्ह्यात वालगावलगत पूर्णा नदीच्या काठावर संत गाडगेबाबा वृद्धाश्रम चालवण्यात येते. या वृद्धाश्रमात अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागातील मुलांनी सोडून दिलेले एकूण 30 वृद्ध या वृद्धाश्रमात राहतात. डॉ. कैलास बोरसे हे पत्नी मंगला यांच्यासह मागील 35 वर्षांपासून या वृद्धाश्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत.

amravati
कोरोना काळातली संत गाडगेबाबा वृद्धाश्रमांची परिस्थितीचा आढावा
author img

By

Published : Jun 17, 2020, 6:58 PM IST

अमरावती - कोरोनाचे भीषण संकट जगावर ओढवले आहे. वृद्धांवर कोरोनाचा झपाट्याने परिणाम होतो. अशा बातम्या आपण पाहिल्या असतील. येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाच्यावतीने या संकटकाळात आपल्या आई- वडिलांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन मुलांना करण्यात आले. मात्र, आधीच परक्या करून टाकलेल्या आपल्या आई- वडिलांची आठवण एकाही मुलाला आली नाही. अखेर ज्या ठिकाणी ही वृद्ध मंडळी आयुष्याची अखेरची संध्याकाळ काढत आहे ते संत गाडगेबाबांचे वृद्धाश्रमच त्यांचे एकमेव आधार ठरले आहे.

कोरोना काळातली संत गाडगेबाबा वृद्धाश्रमांची परिस्थितीचा आढावा

संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्यावतीने अमरावती जिल्ह्यात वालगावलगत पूर्णा नदीच्या काठावर संत गाडगेबाबा वृद्धाश्रम चालवण्यात येते. या वृद्धाश्रमात अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागातील मुलांनी सोडून दिलेले एकूण 30 वृद्ध या वृद्धाश्रमात राहतात. डॉ. कैलास बोरसे हे पत्नी मंगला यांच्यासह मागील 35 वर्षांपासून या वृद्धाश्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात आपल्या जन्मदात्यांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन वृद्धाश्रमच्यावतीने कैलास बोरसे यांनी वृद्धांच्या मुलांना केले होते. मात्र, या आवाहनाला एकाही वृद्धांच्या मुलाने प्रतिसाद दिला नाही. गंभीर बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पाच - सहा जणांनी आमच्या वृद्ध आई- वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे आहे यासाठी संपर्क साधला, असे कैलास बोरसे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. आता वृद्धाश्रमाची क्षमता 30 वृद्धांपर्यंत आहे. असे असताना गत चार बर्षांपासून वृद्धाश्रमाल शासनाकडून एक पैसाही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे याठिकाणी जे वृद्ध आहेत त्यांना समाजातील काही दानदात्यांकडून मिळणारी मदत आणि उधार आणलेला किराणा, धान्य यावर सगळ्यांचे पोट पोसले जात असल्याचे बोरसे म्हणाले.

लॉकडाऊन असताना एका वृद्ध महिलेला तिच्या मुलाने घराबाहेर काढले. ती कशीबशी अमरावतीत आली. रस्त्यावर झोपली. त्या महिलेची शहर कोतवाली पोलिसांनी चौकशी केली आणि तिला या वृद्धाश्रमात आणून सोडले. आता हेच माझं घर असे ती महिला 'ईटीव्ही भारत' कडे प्रतिक्रिया देताना म्हणाली. मुलाला आम्ही घरात नको होतो. त्यामुळे आम्ही दोघेही घरातून निघालो आणि थेट या वृद्धाश्रमात आलो. असे एक आजी म्हणाली. कोरोनाचे संकट असतानादेखील आमच्या मुलांनी आमची साधी विचारपूस केली नाही. असे जरी असले तरी आम्हाला आता दुःख वाटत नाही. संत गाडगेबाबांच्या या वृद्धाश्रमात कोणालाही कोरोना झाला नाही. आम्हाला कोणतीही अडचण बोरसे कुटुंबीयांनी जाणवू दिली नाही, असेही काही वृद्धांचे म्हणणे होते.

या वृद्धाश्रमात दर आठवड्यात किमान तीन चार दिवस कुठल्याही कार्यक्रमानिमित्त सेवाभावी वृत्तीचे लोकं भोजनदान करतात. कोरोनामुळे असे कार्यक्रम करण्याचा धाडस अनेकांचा झाला नसला तरी काहींनी मात्र जेवण आदींची काहीशी व्यवस्था केली. याठिकाणी आर्थिक अडचण तर आहेच सोबतच आणखी विविध अशा अडचणी आहेत. मात्र, कोरोनाचे संकट असो व दिवाळीची धामधूम असो आपल्या जन्मदात्यांबाबत कोणाला काहीही वाटत नाही, अशा पाषाणहृदयी मुलांच्या आईवडिलांची सेवा करताना सगळ्या अडचणी थिट्या वाटतात, असे कैलास बोरसे म्हणतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.