अमरावती - मार्च महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली असून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेची लाट येणार असतानाच शासनाने संपूर्ण एप्रिल महिनाभर शाळा ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पालकांचा हळूहळू विरोध होतो आहे. हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार चिमुकल्यांना सकाळी 10 वाजल्यानंतर बाहेर पडू देणे अत्यंत घातक आहे. भर उन्हात शाळा ठेवण्याचा निर्णय हा लहान मुलांवर उष्माघाताचे संकट ओढावून घेण्यासारखा आहे.
असा आहे शासनाचा निर्णयकोरोनामुळे शाळा बंदच होत्या. मात्र, मुलांना हवे तसे शिक्षण मिळाले नसल्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्यात यावी. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवावी असेही शासनाने स्पष्ट केले आहे . शाळेत 100% विद्यार्थी उपस्थित राहण्यास सही शासनाने परवानगी दिली आहे.
शाळा म्हणतात आमची तयारी
अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळांनी शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होणार नाही याची काळजी शाळेच्या वतीने घेतली जाईल असेही काही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. मात्र, उष्णतेच्या लाटेत चिमुकले विद्यार्थी खरच किती सुरक्षित राहतील याची शाश्वती मात्र नसल्यामुळे अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर शासनाने देशासमोर आम्हाला दुसरा पर्याय नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले आहे.हेही वाचा - शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत थारा नाही : राजू शेट्टी
काय म्हणतात हवामान तज्ञ
यावर्षी मार्च महिन्यातच उष्णतेच्या दोन तीन लाटा येउन गेल्या आहेत. अमरावती शहरातील तापमान 42 डिग्री पर्यंत वाढलेले होते. तर विदर्भात अनेक जिल्ह्यात तपमान 43.5 डिग्री पर्यंत गेले होते. असे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ञ प्रा. डॉ. अनिल बँड' ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. एप्रिल महिन्यामध्ये साधारण 40 ते 42 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान वाढते. येदा, उन्हाळ्यात उष्णतेच्या अनेक लाटा येण्याची शक्यता असून काही दिवशी तापमान ते 45-46 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना एप्रिलमध्ये शाळेत बोलावले तर उष्माघाताचा त्रास हाऊ शकतो. यामुळे शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच घेणे योग्य राहील. दुपारी उष्माघातचा त्रास हाऊ शकतो. यासह दुपारी 12 ते 4 या वेळात ऊन जास्त राहते. त्यामुळे अल्ट्रावायलेट इंडेक्स जास्त रहाते. याचा परिणाम त्वचेवर होतो. अचानक सूर्याचा प्रकाश पडला तर अन्य आजार होतात. एप्रिल महिन्यात ऊन्हात घराबाहेर पडणे टाळले पाहिजे.
चिमुकल्यांवर उष्माघाताचे संकट आरोग्य यंत्रणेने दिले खबरदारीचे निर्देश यावर्षी उन्हाळ्यात तीव्र असल्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे आणि महत्त्वाची कामे सकाळी लवकरच उरकून घ्यावीत. बाहेर पडताना पाणी सोबत घ्यावे व वारंवार पाणी प्यावे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येकाला शरीराच्या वजनाप्रमाणे पाण्याची गरज भासते 20 किलो वजन यामागे एक लिटर व प्रत्येकाने किमान तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
विदर्भातील शहरात 30 मार्च चे तापमान
अमरावती - 41.8 डिग्र सेल्सियस
अकोला - 43.2 डिग्र सेल्सियस
वाशिम - 42.5 डिग्र सेल्सियस
यवतमाळ - 42.0 डिग्र सेल्सियस
बुलढाणा - 39.8 डिग्र सेल्सियस
नागपुर 42. 1डिग्र सेल्सियसचंद्रपूर 44.2 डिग्र सेल्सियस
गडचिरोली 40.2 डिग्र सेल्सियस
गोंदीया 41.5 डिग्र सेल्सियस