अमरावती - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांच्याविरोधात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखक झाला. स्वतःचा सेवाकाळ वाढल्याने त्यांनी ढोलताशे वाजवत आणि फटाक्यांची अतिषबाजी करत इर्विन चौक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत मिरवणूक काढली होती.
हेही वाचा - मुंबईच्या जोगेश्वरी ओशिवरा येथील आशियाना इमारतीला आग
- कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल
कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी असताना जिल्हा शल्यचिकित्सक पदावरील व्यक्तीची मिरवणूक काढली जाते. फटाक्यांची अतिषबाजीही केली जाते, हा संपूर्ण प्रकार गंभीर असून शहर कोतवाली पोलिसांनी त्यांच्या विरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
- जिल्हा सामान्य रुग्णालय सायलेन्स झोन
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या म्यूकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल आहेत. जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 4051 वर पोहचली आहे. तसेच कोरोनाने जिल्ह्यात 1 हजार 477 जण दगावले असताना जिल्हा शल्यचिकिरस्क हे सायलेन्स झोन असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात ढोल ताशे वाजवून फटाके कसे काय फोडू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- फटाके आले कुठून?
शहरातील फटाक्यांची दुकानं दीड, दोन वर्षांपासून बंद असताना डॉ. शामसुंदर निकम यांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी फटाके कुठून मिळाले? हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.
हेही वाचा - मीरा चोप्रानंतर 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनंही घेतली बेकायदेशीरपणे लस