अमरावती अमरावती शहरात आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने दहीहंडी स्पर्धा आयोजित Dahi Handi competition Organized in Amravati करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे Organized on Behalf of MLA Ravi Rana उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांची रक्ततुला केली Raktula For Devendra Fadnavis जाणार MLA Ravi Ranas Yuva Swabhiman Party आहे.
रक्तदानासाठी उसळली गर्दी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास नवा ते चौक येथे दहीहंडी स्पर्धेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार आहे. या रक्ततुलेसाठी सिद्धार्थ मंगलम येथे आयोजित रक्तदान शिबिरासाठी शेकडो नागरिकांची गर्दी उसळली आहे.
राणा दाम्पत्यांनी दिल्या रक्तदात्यांना शुभेच्छा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन यावेळी रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. रक्तदान करताना ज्या व्यक्तींना बरे वाटत नव्हते, अशा व्यक्तींना खासदार नवनीत राणा यांनी यावेळी धीर देण्याचा प्रयत्न केला. रक्तदान हे राष्ट्रीय कार्य आहे. या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांचे मी आभार व्यक्त करते, असेदेखील खासदार नवनीत राणा यांनी रक्तदात्यांना उद्देशून म्हटले. संवाद साधताना त्या म्हणाल्या, यावेळी युवा स्वाभिमान रक्तदान समितीचे प्रमुख चंद्रकांत जाजोदिया, वीरेंद्र उपाध्ये, कुणाल केवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.