अमरावती - शहरात हिंसाचार झाल्यानंतर आज सायबर क्राईमचा धक्कादायक अहवाल हाती आला आहे. यात भाजप प्रणित हिंदुत्त्ववादी संघटनेचा हात असल्याचा अहवाल दिसून येत आहे, यावर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावतीत संतप्त प्रतिक्रिया दिली. हा सादर झालेला अहवाल खोटा असून महाराष्ट्र कुठंही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतात. भाजपच्या माथी दंगल लावतात, असा आरोप भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी केला तर राज्य सरकारने झालेल्या घटनेची चौकशी करावी, कोणाला तरी जबाबदार धरणे अमरावतीच्या अस्मितेचा अवमान करणं आहे तर लोकांचे संरक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे, अशीही प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अमरावती शहरात दोन दिवस झालेल्या हिंसाचारात तब्बल 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.