ETV Bharat / city

amravati violence : भाजप नेत्यांची धरपकड, डॉ. अनिल बोंडे यांना अटक - भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केली

अमरावती शहरातील हिंचाचाराला (amravati violence) जबाबदार असणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी भाजप (bjp) नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde), भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक तुषार भारतीय (Tushar Bhartiya) यांना अटक केली आहे. प्रवीण पोटे आणि शिवराय कुलकर्णी या दोघांचा पोलीस शोध घेत आहे.

bjp-leaders-arrested-by-police-for-amravati-violence
अनिल बोंडे
author img

By

Published : Nov 15, 2021, 5:14 PM IST

Updated : Nov 15, 2021, 8:47 PM IST

अमरावती - शहरातील हिंचाचाराला (amravati violence) जबाबदार असणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी भाजप (bjp) नेत्यांची धरपकड सुरू केली असून भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde), भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक तुषार भारतीय (Tushar Bhartiya) यांना अटक केली आहे.

शहर कोतवाली पोलिसांनी केली कारवाई

शनिवारी (दि. 13 नोव्हेंबर) शहरात निर्माण झालेला तणाव प्रकरणात पोलिसांनी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे, भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, तुषार भारतीय यांसह भाजपच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज (दि. 15) शहर कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडे यांना सकाळी अटक केली तर दुपारी तुषार भारतीय यांनाही अटक केली आहे. प्रवीण पोटे आणि शिवराय कुलकर्णी या दोघांचा पोलीस शोध घेत आहे.

शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अमरावती शहरातील राजकमल, जयस्तंभ चौक इतवारा बाजार, पठाण चौक, हबीब नगर, हनुमान नगर, खोलापुरी गेट, नागपुरी गेट, भाजी बाजार, अंबा गेट, गांधी चौक, जमील कॉलनी, चपराशी पुरा या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. शनिवारच्या घटनेनंतर शहरात आता शांततेचे वातावरण दिसत आहे. तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस रस्त्यावर सज्ज आहेत.

हे ही वाचा - amravati violence : हिंसाचार प्रकरणी 15 गुन्हे दाखल; 50 जणांना अटक - पोलीस आयुक्त सिंह

Last Updated : Nov 15, 2021, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.