ETV Bharat / city

न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतरच महिला व बालकल्याण मंत्र्यांना विरोध; शहर भाजपचे स्पष्टीकरण - amravati bjp agitation against minister yashomati thakur

न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्र्यांना राजीनामा देण्याची मागणी भाजपने केली असल्याची माहिती अमरावती भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांनी दिली आहे.

amravati bjp
शहर भाजपचे आंदोलन
author img

By

Published : Nov 4, 2020, 6:21 PM IST

Updated : Nov 4, 2020, 6:45 PM IST

अमरावती - भाजपने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. असे असताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपवाले एका महिलेच्या पाठीमागे लागले आहेत. हा आरोप साफ चुकीचा आहे. एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मंत्र्याकडून आम्ही राजीनामा मागत आहोत, असे प्रत्युत्तर भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या आरोपांवर दिले आहे. आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसला उत्तर दिले आहे.

अमरावती शहर भाजपचे आंदोलन

हेही वाचा -जसं नाईक यांचं प्रकरण उघडलं तसं आता परमार आणि इतरांच्या पेंडिंग केसेस उघडाव्या - आशिष शेलार

सात दिवसांपासून सुरू आहे आंदोलन -

2012 मध्ये शहरातील गांधी चौक परिसरात एकेरी मार्ग असताना यशोमती ठाकूर यांचे वाहन घुसल्याने वाहतूक पोलीस शिपाई विलास वराळे यांनी हटकले असताना त्यांना यशोमती ठाकूर आणि त्यांच्या वाहनातील दोघांनी मारहाण केली होती. या प्रकरणात यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 ऑक्टोबरला ठाकूर यांना दोषी ठरवले. न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून, सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजपचे आंदोलन सुरू आहे.

काँग्रेसच्या आमदारांना आमची भूमिका पटली असेल

महिला व बालकल्याण मंत्र्याविरुद्ध आमच्या आंदोलनामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी पत्रक कडून आमच्यावर टीका केली. असे असताना काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी आमच्या आंदोलनाबाबत एक शब्दही काढला नाही. कदाचित त्यांना आमची भूमिका पटली असावी असे किरण पातूरकर म्हणाले.

हेही वाचा - अर्णब गोस्वामींच्या अटकेवर काँग्रेसचे नेते काय म्हणाले?

गुरुवारी चंद्रकांत पाटील देणार आंदोलनस्थळी भेट

भाजपच्या विभागीय बैठकीसाठी गुरुवारी अमरावतीला येणारे पक्षाचे ओरदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनस्थळा भेट देणार आहेत. त्या दरम्यान ते कार्यकर्त्यांना संबीधित करतील असे किरण पातूरकर यांनी सांगितले.

यशोमती ठाकुरांविरुद्ध घोषणा

यशोमती ठाकूर राजीनामा दो, गुंडाराज चालणार नाही अशा घोषणा मागील सात दिवसांपासून भाजपचे पदाधिकारी - कार्यकर्ते देत आहेत. महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, महापालिका स्थायी समिती सभापती राधा कुरील यांच्यासह सुरेखा लुंगारे,शिल्पा पाचघरे, लता देशमुख, भाजपचे माजी शहर अश्याक्ष जयंत डेहनकर, आदी यावेळी उवस्थित होते.

Last Updated : Nov 4, 2020, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.