जालना - अमरावती येथील प्रख्यात गायक पंडीत भोजराज चौधरी यांना "पंडित आप्पासाहेब जळगावकर संगीत सन्मान पुरस्कार 2019" ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक पंडित आप्पासाहेब जळगावकर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
मूळ जालना येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध संवादिनी वादक पं. आप्पासाहेब जळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. शनिवारी सायंकाळी एका संगीत महोत्सवात हा पुरस्कार सन्मानपूर्वक अमरावती येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित भोजराज चौधरी यांना प्रदान करण्यात आला. प. पु. भगवान महाराज संगीत महाविद्यालय जालना, सर्वेश इव्हेंट्स पुणे व स्मृती सुगंध अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जालनाकरांनी पुरस्कार सोहळ्यासोबतच संगीत मैफलीचाही आनंद लुटला
या पुरस्कार सोहळ्यास जालनावासियांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रसाद चौधरी, हनुमंत फडतरे, पं. योगराज चौधरी, पं. दिलीप काळे यांच्या संतूर वादन, शास्त्रीय गायन या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.