ETV Bharat / city

Amravati Zilla Parishad school जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार, दारू पिऊन वर्गातच शिक्षकांने केली लघुशंका - Teacher drunk

Amravati Zilla Parishad school शिक्षकाने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करणे सोडून शाळेला सुटी झाल्याचे सांगितले व मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोप घेऊन तेथेच लघुशंका केली आहे. त्याची ही अवस्था बघण्याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला असता. तो उलट पालकावरच दादागिरी करत होता.

Amravati Zilla Parishad school
Amravati Zilla Parishad school
author img

By

Published : Aug 20, 2022, 11:01 AM IST

अमरावती धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल शाळेतील शिक्षकाने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करणे सोडून शाळेला सुटी झाल्याचे सांगितले व मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोप घेऊन तेथेच लघुशंका केली आहे. त्याची ही अवस्था बघण्याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला असता. तो उलट पालकावरच दादागिरी करत होता. त्याची व्हिडिओ शूटिंग काढून व त्याची लेखी तक्रार पालकांनी त्याच्यावर कारवाई करण्याकरिता धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांना दिली आहे.

Amravati Zilla Parishad school

असे आहे प्रकरण धारणी पंचायतमधील शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. तेथे गावातील 200 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना विद्या दानाचे कार्य करण्याकरता एकूण 4 शिक्षक शाळेत कार्यरत असून त्यापैकी एक शिक्षका प्रसूती रजेवर आहे. अन्य 3 शिक्षक शाळेत कार्यरत असतात. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान 3 पैकी एक सहायक शिक्षक पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण वय 38 हा शाळेत दारू पिऊन आला व त्याने त्याच्या वर्गातील विद्यार्थांना आज शाळेला सुटी असल्याचे सांगितले.

झोपेतच लघुशंका केली विद्यार्थांना बाहेर हाकलून दिले. स्वतः वर्गातील खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथे झोपला. झोपेतच लघुशंका केली त्यादरम्यान वर्गातील विद्यार्थ्यांनी त्याची ही अवस्था बघितली व स्वतःच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. त्यावेळी उपसरपंच अशोक कासदेकर पालक वर्ग सुरेंद्र पटोरकर, भुरेलाल बेठेकर शाळा वयवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर उपाध्यक्ष नंदलाल जावरकर हे शाळेत पोहचले. शाळेत शिक्षक पृथ्वीराज चौहान हा दारूच्या नशेत खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथेच लघुशंका केलेल्या अवस्थेत आढळला. पालकांनी त्याला झोपेतून उठवल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवता, आज सुटी का दिली अशी विचारणा केली असता. तो त्यांच्यावरच दादागिरी करत होता.

पालकांनी केली तक्रार पालकांनी संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याकरता धारणीचे गट विकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार व संबंधित शिक्षकाचे झोपल्याचे व दारू पिऊन डोलत असल्याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण पाठविले आहे. याबाबत धारणीचे गटविकास अधिकारी महेश पाटील काय कारवाई करतात का ? याकडे पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.

शाळेतून हाकलपट्टी करण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवता ढासळली आहे. शाळेत 4 शिक्षक कार्यरत आहे. एक प्रसूती रजेवर आहे, तर दोन शिक्षकांच्या दारू पिण्याबाबतच्या वारंवार तक्रारी विध्यार्थी करतात. एका मुख्यध्यापकावर शाळा चालत आहे. त्यामुळे आज गावपंचायतमध्ये सर्व पालकांना बोलावून उद्या नशेत असणारे शिक्षक आमच्या शाळेतून हाकला व दुसऱ्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करणार असल्याचे काकरमलचे उपसरपंच अशोक कासदेकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.