अमरावती - विद्याभारती शिक्षण संस्था संचालित वस्तीगृहामध्ये (20 जुलै)रोजी आदर्श नितेश कोगे या विद्यार्थ्यांची नाक तोंड दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या देण्याची भूमिका आदिवासी बांधवांनी स्पष्ट केली आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण - शहरातील विलास नगर लगत पत्रकार कॉलनी परिसरात स्थित विद्याभारती शिक्षण संस्थेच्या शाळेत इयत्ता सातवी शिकणारा चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा येथील विद्यार्थी आदर्श नितेश कोगे हा शाळेच्या परिसरातच असणाऱ्या संस्थेच्या वस्तीगृहात राहत होता. 21 जुलैला पहाटे तो त्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. 20 जुलैला त्याने मला वस्तीगृहातील गृहपाल त्रास देत असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे सांगितले असल्याचे आदर्शाचे वडील नितेश कोगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
संविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट - आदर्श कोगे या विद्यार्थ्यांची नागपूर दाबून हत्या झाल्याचे शौविच्छेदन अहवाला स्पष्ट झाले आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याचे शेवछेदन करण्यात आले होते.
अशी आहे कुटुंबीयांची मागणी - देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची संस्था असणाऱ्या विद्याभारती शिक्षण संस्था शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचे अनुदान लाटत असून या संस्थेत दलित आदिवासी विद्यार्थी सुरक्षित नाहीत. विद्यार्थ्यांना हवे असणाऱ्या सुविधा या ठिकाणी नाही, आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावाने शासनाकडून कोट्यवधी रुपयाचे अनुदान लाटून विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळाने केवळ आपले हित साधले असून आमच्या मुलाची हत्या करण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे.
परिसरातून एकही आदिवासी बांधव हटणार नाही - या हत्तेसाठी जबाबदार असणारा गृहपालासह शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी अशी मागणी आदर्शचे वडील नितेश कोगे यांनी केली आहे. दरम्यान अखिल बलई -मेहरा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिया देण्यात आला आहे . न्याय मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून एकही आदिवासी बांधव हटणार नाही असा इशारा अखिल बलई मेहरा समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष बाबूजी अजनेरिया, उपाध्यक्ष जीवन पंडोले. सचिव राजेश गाठे यांनी दिला आहे.
हेही वाचा - सभागृहात फलक घेऊन येणाऱ्या सदस्याला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही, ओम बिर्ला यांचा सज्जड दम