अमरावती - अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर ( Ink threw on Pravin Ashtikar ) यांच्यावर आमदार रवी राणा समर्थकांनी शाई फेकल्याच्या निषेधार्थ माहापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवार पर्यंत काम बंद आंदोलन ( Amravati Mnc employees on strike ) छेडले आहे.
आमदार रवी राणा यांच्या अटकेची मागणी
राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतपणे बसविलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा राग म्हणून अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी काळीशाई फेकली होती. त्यामुळे महापालिका आयुक्त आष्टीकर यांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून पालिकेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांनी केली.
सोमवार पर्यंत काम बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शाईफेकीचा तीव्र निषेध कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत असून आज महापालिकेसमोर सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पाच जणांना अटक
या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आमदार रवी राणा यांच्यासह सहा जण फरार आहेत.
हेही वाचा - अमरावती मनपा आयुक्तांवर महिलांनी केली शाईफेक; जय भवानी जय शिवाजी दिल्या घोषणा