ETV Bharat / city

Graduate constituency election: पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी अमरावती विभागात १ ऑक्‍टोबरपासून मतदार नोंदणी - amravati graduate constituency election

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांत येत्‍या १ ऑक्टोबर पासून पदवीधर मतदारसंघातील निवडणूकांसाठी (Graduate constituency election) मतदार नोंदणी (voters registration) मोहीम सुरू करण्‍यात येणार आहे. यावर्षीची अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्‍तांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त
author img

By

Published : Sep 28, 2022, 6:19 PM IST

अमरावती: अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांत येत्‍या १ ऑक्टोबर पासून पदवीधर मतदारसंघातील निवडणूकांसाठी (Graduate constituency election) मतदार नोंदणी (voters registration) मोहीम सुरू करण्‍यात येणार आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी एक जागा निवडल्या जाणार आहे.

विभागीय आयुक्तांनी दिली माहिती: विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मतदार नोंदणीबाबत जाहीर अधिसूचना १ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात येणार असून ही मोहीम ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांचा कार्यकाळ पुढील वर्षी ७ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने मतदार नोंदणीचे काम हाती घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. विधानसभेच्या मतदार याद्यांप्रमाणे विधानपरिषदेच्या मतदार याद्या नव्याने तयार करायच्या आहेत. या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीच्या मतदार याद्या वापरल्या जात नाहीत, मतदारांना नव्याने नोंदणी करावी लागेल असे त्यांनी नमूद केले. तसेच १ नोव्हेंबर २०१९ पूर्वी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेल्या मतदारांना विभागातील संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे फॉर्म १८ भरून त्यांची नावे नोंदवता येतील.

30 डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होणार: या निवडणूकींमध्ये अनेक पदवीधरांकडून फॉर्म भरले जात नाहीत. तसेच मतदार नोंदणीच्‍या बाबतीत पदवीधरांमध्‍ये उदासीनता दिसून येते. या वेळी पदवीधरांची संख्या गेल्या वेळी नोंदवलेल्या मतदारांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने मतदारांची संख्या वाढली पाहिजे यासाठी विभागीय आयुक्त प्रयत्नशील आहेत. मतदारांची संख्या किमान २० टक्के तरी वाढावी यासाठी पदवीधरांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्‍यात येत आहेत. यावर्षीची अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्‍तांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.