ETV Bharat / city

Amravati Government Medical College : 35 वर्षांपासून अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्रतिक्षा, सहा वर्षांपासून पाठपुरावा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बेपत्ता

राज्यातील विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत गेल्या पस्तीस वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होते (Amravati Government Medical College) आहे.वास्तवात मात्र अमरावतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्यापही बेपत्ताच (College remains missing) आहे.

Amravati Government Medical College
अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बेपत्ता
author img

By

Published : Oct 13, 2022, 2:04 PM IST

Updated : Oct 13, 2022, 2:23 PM IST

अमरावती : राज्यातील विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत गेल्या पस्तीस वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होते (Amravati Government Medical College) आहे. 2016 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक चळवळ होऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. 2021 च्या जानेवारी महिन्यात आता अमरावतीत हमखास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार अशा घोषणा झाल्या. वास्तवात मात्र इतकं सारं होऊन देखील अमरावतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्यापही बेपत्ताच (College remains missing) आहे.

भाजपच्या शहराध्यक्षांचा पुढाकार - अकोला, यवतमाळ अशा छोट्या शहरांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असताना अमरावती शहरात देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी 2016 मध्ये भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आणि एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी पुढाकार घेतला होता. हजारो अमरावती करांच्या सह्यांची निवेदन त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले होते. सलग दोन अडीच वर्ष वैद्यकीय महाविद्यालयासाठी चळवळ राबविण्यात (Amravati Government Medical College follow up) आली.

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बेपत्ता प्रतिक्रिया देताना अधिकारी व प्रतिनिधी

सरकार बदललं, राजकारण सुरू - 2019 मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने अमरावती शहरात मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग येथे पळवले, असा आरोप करण्यात आला. यानंतर अमरावतीच्या आमदार सुलभा कोडके यांनी या आरोपाचे खंडन करीत 10 जून 2021 रोजी 2021 22 मध्ये अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून याबाबत सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 मार्च 2021 च्या अर्थसंकल्पीय भाषणात तसेच स्पष्ट केले असल्याचे सांगितले होते. त्यावेळी सुलभा घोडके यांनी किरण पातुरकर यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सादर केलेल्या निवेदनाची साधी दखलही घेतली नव्हती, असा आरोप केला होता. यांसह जिल्ह्यात भाजपमध्ये डॉक्टर सुनील देशमुख, डॉक्टर रणजीत पाटील, डॉक्टर अनिल बोंडे असे तीन डॉक्टर असताना देखील त्यापैकी एकानेही अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी प्रयत्न केले नाही. असा आरोप सुलभा खोडके यांच्यासह त्यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केला (Government Medical College remains missing) होता.

यशोमती ठाकूर यांची घोषणा - अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाची विशेष समिती 2019 मध्ये अमरावतीत दाखल झाली होती. त्यावेळी अमरावती शहरात नांदगाव पेठ येथील 18.53 हेक्टर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार असे निश्चित झाले होते. त्यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी आता अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी, सर्व अडचणी दूर झाल्या असून या महाविद्यालयासाठी जमीन देखील उपलब्ध झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसातच अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार, अशी घोषणा यशोमती ठाकूर यांनी केली (Government Medical College remains missing) होती.

राणांचा अट्टहास हट्ट - अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे बड्डेला मतदारसंघात येणाऱ्या अंजनगाव बारी या मार्गावरच व्हायला हवे. यासाठी आमदार रवी राणा यांनी हट्ट धरला होता. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा आणि माझ्या प्रयत्नामुळे अंजनगाव बारी मार्गावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध झाली असून, अंजनगाव बारी मार्गावर हे महाविद्यालय लवकरच सुरू होणार, असे आमदार रवी राणा यांनी देखील जाहीर केले होते.

विषय पुन्हा ऐरणीवर - अमरावतीचे नवे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच अमरावतीत आले होते. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनीष राठी यांच्या नेतृत्वात त्यांना अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात निवेदन सादर करण्यात आल्यामुळे अमरावतीच्या राजकीय मंडळींना विसर पडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय म्हणतात डॉक्टर ? गट 35 वर्षांपासून अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होत असताना 2016 मध्ये किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात विशेष चळवळ सुरू झाली. त्याचा परिणाम म्हणून 2018 19 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा देखील केली होती. असे असताना अमरावती जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे हेवे दावे यामुळे हे महाविद्यालय रखडले गेले. वास्तवात अमरावती जिल्ह्यातील हजारो जणांना रोजगार या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे रोजगार प्राप्त होऊ शकतो. लगतच्या अकोला यवतमाळ या जिल्ह्यात गट दहा वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहेत. मेळघाट सारखा आदिवासींचा मोठा भाग अमरावती जिल्ह्यात असून आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे, अत्यंत गरजेचे आहे. दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्तीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत आजपर्यंत होऊ शकले नाही. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपले राजकारण बाजूला सारून जिल्ह्याच्या विकासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकत्रित यावे. अशी विनंती महाराष्ट्र राज्य बालरोग संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. मेळघाटसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही मागणी केली असून सर्व स्तरावर यासाठी प्रयत्न व्हावे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहसचिव डॉक्टर नीरज मुरके 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

काय म्हणतात भाजप शहराध्यक्ष - अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी मी गत पाच वर्षांपासून आंदोलन करतो आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आम्ही मोर्चे काढले नेत्यांना घेराव टाकला स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले. 27 एकर मी क्लास जमीन वैद्यकीय उच्च शिक्षण विभागाच्या नावावर करून दिली आहे. मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार अशी घोषणा केली होती. राज्यात सरकार बदलल्यावर महाविकास आघाडी सरकारने देखील अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. मात्र पैसे देताना नंदुरबार आणि सातारा उस्मानाबाद नंदुरबार आणि सिंधुदुर्गला पैसे दिले अमरावतीला काहीच दिले नाही. यावेळी मात्र आता आमची कठोर भूमिका राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वात आधी एक ओएसडी, एक दिन यांची त्वरित नेमणूक करावी, ताप नेमावा, अर्थसंकल्पात 25 कोटी 50 कोटी रुपये मंजूर करून ते तातडीने द्यावेत, आणि इंडियन मेडिकल कौन्सिल ला अर्ज करणे या चार स्टेप्स त्यांनी तातडीने पूर्ण कराव्यात. असे भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले. अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही राजकीय नेत्यांनी हमखास श्रेय घ्यावे. मात्र अडथळा आणू नये, अशी विनंती देखील किरण पातुरकर यांनी केली आहे.

काँग्रेस म्हणते नेतृत्वाचे अपयश - पश्चिम विदर्भातील शिक्षणासह अनेक प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता होणार आता होणार असे वारंवार केवळ सांगितले जात आहे. खरंतर आपल्या जिल्ह्याचा नेतृत्वाचा हे अपयश असल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

Last Updated : Oct 13, 2022, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.