ETV Bharat / city

Amravati district load shedding : अमरावती जिल्ह्यात अघोषित लोडशेडींग; शेतकऱ्यांना जबर फटका - वीज पुरवठा अमरावती

शहरी भागांत 24 तासांत अधून - मधून कधीही काही भागांमध्ये वीजपुरवठा अचानक खंडित ( Amravati district load shedding ) होत असून, ग्रामीण भागात शेतात पाणी देण्यासाठी अक्षरश: छळ करून वीज दिली ( Amravati load shedding news ) जात असल्याने शेतकरीही त्रस्त असल्याचे वास्तव पाहायला मिळते.

Electricity
वीज
author img

By

Published : Apr 21, 2022, 7:20 AM IST

अमरावती - राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणत असले तरी, अमरावती जिल्ह्यात मात्र अघोषित लोडशेडिंगचा ( Amravati district load shedding ) त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरी भागांत 24 तासांत अधून - मधून कधीही काही भागांमध्ये वीजपुरवठा अचानक खंडित ( Amravati city load shedding ) होत असून, ग्रामीण भागात शेतात पाणी देण्यासाठी अक्षरश: छळ करून वीज दिली ( Amravati load shedding news ) जात असल्याने शेतकरीही त्रस्त असल्याचे वास्तव पाहायला मिळते.

माहिती देताना शेतकरी, गृहिणी आणि भाजप नेते

हेही वाचा - Hanuman Chalisa Issue : राणा दाम्पत्य 23 एप्रिलला मातोश्रीवर करणार 'हनुमान चालीसा पठण'

वीज नसल्याने शेतकरी त्रस्त - आठवड्यातून केवळ तीन दिवस सकाळी वीजपुरवठा असतो, तर चार दिवस दिवसा पूर्णतः वीज खंडित राहते. ज्या दिवशी वीज नसते त्यावेळी दिवसाऐवजी रात्री शेतात वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळेस शेतात काम करणे सोपे नाही. मध्यरात्री कधीतरी वीज येते आणि रात्रीच्या काळोखात पिकांना पाणी द्यावे लागते. हा प्रकार गत दीड - दोन वर्षांपासून सुरू आहे. आता महिनाभरात तर विजेचा लपंडाव चांगला छळायला लागला आहे, असे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ( Amravati farmers on load shedding ) 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

16 तासांपर्यंत वीज पुरवठा होतो खंडित - अमरावती शहरात अनेक भागांत अर्धा तास किंवा कधी तासभर वीज पुरवठा खंडित होतो. शहरातील काही भागांत मोजक्या ठिकाणी मात्र सलग 16 तासापर्यंत वीज पुरवठा खंडित केल्याचा प्रकारही घडत आहे. झोपडपट्टी भागात अनेक तासांपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

सरकारचे लक्ष नसल्याचा भाजपचा आरोप - राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेला वीज पुरवण्यासह सर्वच क्षेत्रांत अयशस्वी ठरत असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष आणि अमरावती एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले सरकार वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आपल्या नेत्यांना किडीपासून वाचविण्यात व्यस्त आहेत. केंद्र सरकारने देशात सर्वाधिक कोळसा हा महाराष्ट्राला दिला असताना महाराष्ट्राला मुबलक कोळसा मिळाला नाही, असा खोटा आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत करीत आहेत, असेही किरण पातुरकर यांनी म्हटले.

जिल्ह्यात भारनियमन नसल्याचा दावा - अमरावती जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही. शिवाय शेतीलाही आठ तासाचा अखंडित वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी सांगितले आहे. मध्यंतरी विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने गरजेनुसार कळवा येथील भार व्यवस्थापन केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार आकस्मिक भारनियमन करण्यात आले होते, असेही दिलीप खानंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - MLA Ravi Rana on Yashomati Thakur : अमरावती जिल्ह्यात सुव्यवस्था राखण्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर अपयशी - आमदार रवी राणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.