ETV Bharat / city

Amravati Administrators : अमरावती महापालिकेत प्रशासकीय कारभार; विकामकामे जलदगतीने - अमरावती महापालिकेत प्रशासकीय कारभार

अमरावती महानगरपालिकेत (Amravati Corporation) 9 मार्च 2022 पासून प्रशासकीय कारभाराला प्रारंभ झाला आहे. शहराची संपूर्ण धुरा आता प्रशासकांच्या हाती (Administrative work in Amravati Corporation) आली असताना शहरातील स्वच्छतेच्या कामासोबत विकासाची कामे सुरळीतपणे होत असल्याचे चित्र आहे.

Amravati corporation
अमरावती पालिका
author img

By

Published : Apr 29, 2022, 8:12 PM IST

Updated : Apr 29, 2022, 8:39 PM IST

अमरावती - अमरावती महानगरपालिकेत (Amravati Corporation) 9 मार्च 2022 पासून प्रशासकीय कारभाराला प्रारंभ झाला आहे. शहराची संपूर्ण धुरा आता प्रशासकांच्या हाती (Administrative work in Amravati Corporation) आली असताना शहरातील स्वच्छतेच्या कामासोबत विकासाची कामे सुरळीतपणे होत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याससुद्धा प्रशासकांच्यावतीने जलदगतीने निर्णय घेतले जात आहेत.

डॉ. प्रवीण आष्टीकर - प्रशासक, अमरावती महानगरपालिका

विकासात्मक कामांचा दर्जा उंचावणे यावर भर - प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यावर बरीच जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीचे भान राखून महानगरपालिकेचे जे दैनंदिन कर्तव्य, जबाबदारी आहेत ती चांगल्या प्रकारे निभावण्याकडे माझे लक्ष असल्याचे अमरावती महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. विकासात्मक कामांचा दर्जा उंचवण्याकडेही आमचे लक्ष आहे. विकासात्मक कामे गतीने व्हावी याकडेसुद्धा आमचे लक्ष असून, महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणे, शहरातील स्वच्छतेची कामे, आरोग्य व्यवस्था तसेच शिक्षण व्यवस्था सुधारावी, अशा कामांवर सध्या भर दिला जात आहे, असेही डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग - अमरावती महापालिकेत सध्या प्रशासकीय कारभार असला तरी पावसाळ्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच शहरातील 18 मोठे नाले आणि 22 लहान नाल्यांच्या सफाईच्या कामांना वेग आला आहे. 18 एप्रिल पासून शहरातील नाल्यांची सफाई जेसीबी आणि पोकलेन द्वारे सुरू झाली आहे, ज्या ठिकाणी नाल्यांवर मशीन लागू शकत नाही अशा ठिकाणी मनुष्यबळ लावून नाल्यांची सफाई सुरु झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची रात्रपाळी ड्युटी लावण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे कोसळणारे बांधकाम इमारती यातून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोचविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आतापासूनच सज्ज झाले आहेत. शहरातील अर्धवट पडलेल्या इमारती या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या असून या इमारती पाडण्याची कारवाई येत्या काही दिवसात सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील एकूण 45 इमारती या कोसळण्याच्या अवस्थेत असून त्यात राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावून इमारत खाली करावी असे सूचित करण्यात आले आहे.

प्रत्येक भागात दैनंदिन सफाई - शहरातील सर्वच भागांमध्ये नेहमीप्रमाणे दैनंदिन सफाईची कामे सुरळीत होत आहेत. घंटागाडी तसेच सफाई कर्मचारी जवळपास सर्वच भागांमध्ये नेहमीप्रमाणेच कामावर येत असल्याचे चित्र आहे.

आमदार घेणार महापालिकेचा आढावा - अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी प्रत्येक सोमवारी अमरावती महापालिकेतील विभाग निहाय आढावा घेतला जाईल, असे म्हटले आहे. शहरातील आरोग्याच्या प्रश्नावर विशेष भर दिला जाणार असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. प्रवीण आष्टीकर सातवे प्रशासक - 1 मे 1983 मध्ये अमरावती महानगरपालिकेची स्थापना झाली. 1983 पासून 2022 पर्यंत अमरावती महापालिकेत एकूण सात प्रशासक नेमण्यात आले आहेत . 15 ऑगस्ट 1983 ते 9 नोव्हेंबर 1983 दरम्यान के . एम पाटणकर हे महापालिकेचे प्रशासक होते. 10 नोव्हेंबर 1983 ते 22 नोव्हेंबर 1984 दरम्यान बी . के झांबरे यांनी अमरावती महापालिकेत प्रशासक म्हणून जबाबदारी हाताळली. 23 नोव्हेंबर 1984 ते पाच जून 1986 पर्यंत के के नायडू हे अमरावती महापालिकेत प्रशासक होते 6 जून 1986 ते 20 जून 1987 दरम्यान एम एल पेंडसे यांनी प्रशासक म्हणून अमरावती महापालिकेत काम केले. 10 ऑगस्ट 1987 ते 20 जून 1990 या काळात जि.. एन तलरेजा हे अमरावती महापालिकेत प्रशासक होते .. 20 जून 1990 ते सहा जुलै 1991 पर्यंत एच आर कुलकर्णी यांनी अमरावती महापालिकेच्या प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली होती . 1991 मध्ये अमरावती महापालिकेची पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. आता 21 वर्षानंतर अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे सातवे प्रशासक म्हणून अमरावती महापालिकेचा कारभार हाताळत आहेत.

हेही वाचा - BMC Work Going Slow Swing : 'प्रशासकांच्या कार्यकाळात पालिकेचे कामकाज संथ गतीने! 368 प्रस्ताव रखडले', आयुक्त म्हणाले...

Last Updated : Apr 29, 2022, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.