ETV Bharat / city

Amravati Children Vaccination : अमरावतीत 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण; 'या' केंद्रावर घेता येणार लस - अमरावती महानगरपालिका लसीकरण केंद्र

आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील ( Amravati 15 To 18 Age Group Vaccination ) मुलांचे करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अमरावती जिल्ह्यात 40 केंद्रांवर ( Amravati Children Vaccination Centers ) हे लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Amravati Children Vaccination
Amravati Children Vaccination
author img

By

Published : Jan 3, 2022, 4:08 PM IST

अमरावती - कोरोनाच्या तिसऱ्या लाटीची शक्यता आणि ओमायक्रॉनचे वाढते ( Omicron In Maharashtra ) रुग्ण या पार्श्वभूमीवर आजपासून 15 ते 18 वर्षे ( Amravati 15 To 18 Age Group Vaccination ) वयोगटातील मुलांचे करण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अमरावती जिल्ह्यात 40 केंद्रांवर ( Amravati Children Vaccination Centers ) 15 ते 18 वर्ष वयोगटाताली मुलांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.

प्रतिक्रिया

155 केंद्रांवर दिली जाणारी लस -

अमरावती जिल्ह्यात एकूण 155 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 40 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींना लस देण्यात आली. अमरावती शहरात सबनीस प्लॉट, विलासनगर, बिच्छू टेकडी, बडनेरा आणि दसरा मैदान येथील महापालिकेच्या रुग्णालयात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांची गर्दी उसळली होती.

शासकीय केंद्रांवर लसीकरण मोहीम -

15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात 35 आणि महापालिका क्षेत्रात पाच अशा 40 केंद्रांवर लाच दिली जात आहे. हे सर्व केंद्र शासकीय केंद्र असून यानंतर शाळा महाविद्यालय आणि आश्रम शाळांमध्ये सुद्धा केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातही प्रतिसाद -

गेल्या दोन वर्षापासून पछाडणाऱ्या कोरोनापासून मुक्ती मिळावी, यासाठी शहरी भागातील तरुणांसह ग्रामीण भागातदेखील लसीकरणासाठी भक्कम असा प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यात अंजनगाव बारी, यावली शहीद, भातकुली, खोलापूर, तळवेल, करजगाव, निमगव्हाण, पळसखेड, आमला, धामणगाव रेल्वे, तळेगाव दशासर, अंजनसिंगी दर्यापूर, चिखलदरा, सेमाडोह, धारणी, कळमखार, वरुड, बेनोडा, आमनेर, मोर्शी, नेरपिंगळाई, मार्डी, कुर्‍हा, तळेगाव दशासर, नांदगाव खंडेश्वर, पापळ, सातेगाव, कापुसतळणी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि धामणगाव गडी या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

लसवंत होण्याचा आनंद -

घरातील ज्येष्ठांचे कोरोना लसीकरण झाले असताना आपल्याला कोरोना कवच कधी मिळेल याची आतुरतेने प्रतीक्षा करीत असणाऱ्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणाईने उत्स्फुर्तपणे आज लसीकरण केंद्र गाठले. आज पहिलाच मिळाल्याचा आनंद तरुणांनी व्यक्त केला असून तीन महिन्यानंतर लसीचा दुसरा डोज मिळाल्यावर आपण जसवंत होऊ आणि कोरोना पासून सुरक्षित राहू अशा प्रतिक्रियाही आज लस घेणाऱ्या युवक युवतींनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा - Vaccination For 15 to 18 : आजपासून राज्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात; पाहा कुठे काय परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.