ETV Bharat / city

4 वर्षांपूर्वी पत्नीचे झाले होते निधन, श्रद्धांजली म्हणून पती स्मशानभूमीत घेतो रक्तदान शिबीर - स्मशानभूमी रक्तदान शिबीर अमरावती

हयात असताना रुपाली या रक्तदान शिबीर घ्यायच्या. पण, त्यांच्या अकाली निधनानंतर ही चळवळ सुरू राहावी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे पती अमोल चवणे हे मागील सात वर्षांपासून अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत रक्तदान शिबीर घेत आहेत.

Amol chavne blood donation camp
स्मशानभूमी रक्तदान शिबीर अमरावती
author img

By

Published : Jan 3, 2022, 4:26 PM IST

अमरावती - आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याची शपथ घेतली. पण, नियतीसमोर सर्व थांबले. पत्नीला एका दीर्घ आजाराची लागण झाली. तिला वाचवण्यासाठी पतीने अथक प्रयत्न केले. पण, काळाने घाला घातला आणि तिचे निधन झाले. रुपाली चवणे असे निधन झालेल्या पत्नीचे नाव आहे.

माहिती देताना अमोल चवणे आणि रक्तदाता

हेही वाचा - Amaravati Cotton : पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्याला ९५०० रुपये प्रति क्विंटल दर

हयात असताना रुपाली या रक्तदान शिबीर घ्यायच्या. पण, त्यांच्या अकाली निधनानंतर ही चळवळ सुरू राहावी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे पती अमोल चवणे हे मागील सात वर्षांपासून अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत रक्तदान शिबीर घेत आहेत. आतापर्यंत दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

अमोल चवणे व रुपाली चवणे हे दाम्पत्य शिवरत्न जीवबा महाले चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करत होते. परंतु, चा वर्षांपूर्वी रुपाली यांचे एका आजारांने निधन झाले. रुपाली यांच्या निधनानंतर त्यांची रक्तदान चळवळ थांबू नये. तसेच, श्रद्धांजली म्हणून त्यांचे पती अमोल चवणे हे शिवरत्न जीवबा महाले चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी अमरावती येथील हिंदू स्मशान भूमीत रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. पत्नी हयात असताना तीन वर्षे आणि पत्नीच्या निधनानंतर चार वर्षे, असे एकूण सात वर्षांपासून हा रक्तदानाचा उपक्रम ते राबवत आहेत.

..या कारणाने स्मशानभूमीत घेतले जाते रक्तदान शिबीर

हल्ली रक्तदान शिबीर हे शासकीय रुग्णालय, मंदिर किंवा एखाद्या हॉलमध्ये घेतले जाते. परंतु, स्मशानभूमीमध्ये मात्र कुणीच रक्तदान शिबीर घेत नाही. स्मशानभूमीबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत, भीती आहे. ते दूर होण्यासाठी स्मशानभूमीमध्येच रक्तदान शिबीर आम्ही आयोजित करत असल्याचे अमोल चवणे यांनी सांगितले. स्मशानभूमी हे एक प्रसन्न ठिकाण आहे, असेही त्यांनी सांगितले.

एका दाम्पत्याने केले 101 वेळा रक्तदान

अमरावतीमधील नितीन देशमुख व त्यांच्या पत्नी अनेक वर्षांपासून रक्तदान करत आहेत. आजही या दाम्पत्याने रक्तदान केले. नितीन देशमुख यांनी आज 76 व्या वेळेस तर, त्यांच्या पत्नी यांनी 25 व्या वेळेस रक्तदान केले.

हेही वाचा - Etv Bharat Special : अमरावतीतील कचरा फेकला जातो जंगलात, प्रशासनाचे दुर्लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.