Navneet Rana Love Story : हैदराबाद : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहे. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली आहे. यानिमित्ताने जाणुन घेऊया नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या लव्हस्टोरीबद्दल... ( Navneet - Ravi Rana Love Story ) नवनीत राणा यांनी राजकारणात येण्यापूर्वी पंजाबी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2011 मध्ये त्यांनी अमरावतीच्या बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केले.
नवनीत राणा यांच्याबद्दल माहिती - नवनीत राणा - कौर यांचा जन्म मुंबईमध्ये 3 जानेवारी 1986 झाला. त्या 36 वर्षाच्या आहेत. नवनीत राणा यांना लहानपणापासूनच मॉडेलिंग या क्षेत्राचे आकर्षण होते. त्यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. नवनीत राणा यांनी मॉडेलिंग करण्यासाठी त्यांनी मराठी, पंजाबी, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांना पाच भाषा येतात. राणा हिचे आई-वडील मूळचे पंजाबी आहेत. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. त्यांचे कार्तिका हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 12 त्यांनी मॉडेलिंगचे काम करण्यास सुरुवात केली, राणा यांनी 'दर्शन' या कन्नड चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. नवनीत राणा यांनी पंजाबी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यांनी सीनू वासंती लक्ष्मी (2004) मधून तेलगूमध्ये पदार्पण केले. चेतना (2005), जगपती (2005), गुड बॉय (2005), आणि भूमा (2008) हे त्यांचे नंतरचे काही चित्रपट आहेत. 2010 मध्ये, त्यांनी गुरप्रीत घुग्गी सोबत 'लड गया पेचा' या पंजाबी चित्रपटात काम केले. नवनीत राणा यांनी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी सामूहिक विवाह सोहळयात लग्न केले. त्यानंतर त्या स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय झाल्या.
नवनीत आणि रवी राणा यांच्यात असे आले जुळून - नवनीत राणा यांची आमदार रवी राणा यांच्यासोबत बाबा रामदेव यांच्या आश्रमातील योग शिबिरात भेट झाली. जिथे नवनीत यांचे रवी राणा यांच्यात मैत्री झाली. मैत्रीनंतर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. इतकंच नाही तर हे नातं जोपासण्यासाठी खासदार नवनीत यांनी बाबा रामदेव यांची परवानगीही घेतली होती, त्यानंतरच त्यांनी लग्न केले. नवनीत राणा यांनी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी सामूहिक विवाह सोहळयात लग्न केले. त्यानंतर त्या स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय झाल्या. एकेकाळी पंजाबी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांतील अभिनेत्री असलेल्या नवनीत कौरने २०१४ साली राजकीय इनिंगला सुरुवात केली. 2014 मध्ये त्या पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत होत्या, पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या.
सामूहिक लग्न सोहळ्यात केले लग्न - नवनीत राणा पहिल्यापासून बाबा रामदेव यांच्याशी जोडले गेल्या आहेत. असे म्हटले जाते की बाबा रामदेव यांची मोठी चाहती असण्यासोबतच ती त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे मानते. प्रत्येक मोठ्या निर्णयात रामदेव बाबांची संमती नक्कीच घेतात. योग शिबिरात जात असताना त्यांची भेट राजकारणी रवी राणा यांच्याशी झाली. या सोहळ्यात ३ हजार २०० जोडप्यांचे एकत्र लग्न लावण्यात आले होते. यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव आणि सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो राय यांसारख्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती.
हेही वाचा - Navneet Rana Photos : जाणून घ्या खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यांच्यात नेमका वाद काय आहे?