ETV Bharat / city

House Collapsed in Amravati : घर कोसळल्यानंतर कुटुंबासाठी मोबाईलच ठरला देवदूत

मोबाईलचा अलार्म ( mobile alarm ) मध्यरात्री दीड वाजता वाजला अन् कुटुंबातील एक पाहुणे उठले. त्यांना घराची भिंत पडताना दिसली. त्यानंतर त्यांनी सर्वांना बाहेर ( mobile alarm saves life of family ) काढले. काही वेळातच ही खोली पूर्णत: ढासळली. चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथे हा थरार मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.

author img

By

Published : Sep 16, 2022, 2:33 PM IST

House Collapsed in Amravati
अमरावतीत घर कोसळले

अमरावती : आजच्या काळात मोबाईल ( mobile alarm ) हा डोकेदुखी वाटत असला तरी तो एखादं वेळी तो आपल्या सह कुटूंबियांचे प्राण वाचू शकतो. हे कुणी आपल्याला सांगितले तर विश्वास बसणार नाही. परंतु चांदुर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू या गावातील घडलेल्या घटनेमुळे आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागेल.

त्याचे असे झाले की, चुकीने लागलेला मोबाईलचा अलार्म मध्यरात्री दीड वाजता वाजला अन् कुटुंबातील एक पाहुणे ( mobile alarm saves life of family ) उठले. त्यांना घराची भिंत पडताना दिसली. त्यानंतर त्यांनी सर्वांना बाहेर काढले. काही वेळातच ही खोली पूर्णत: ( house collapsed ) ढासळली. चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथे हा थरार मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.

जावयाच्या मोबाइलचा चुकीने लागलेला अलार्म वाजला ; जीव वाचला प्राप्त माहितीनुसार, सारंगधर श्यामराव लांजेवार व त्यांची पत्नी यांचे वास्तव्य असलेले दोन खोल्यांचे टीन मातीचे घर आहे. लग्न झालेली २५ वर्षीय मुलगी व जावई हे पाच महिन्यांच्या मुलीसह त्यांच्याकडे आले होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपले. दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती. अशातच मध्यरात्री दीडच्या सुमारास जावयाच्या मोबाइलचा चुकीने लागलेला अलार्म ( mobile alarm saves life ) वाजला. त्यांची झोप उघडली व अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंत थोडी-थोडी ढासळत आहे. त्यांनी सर्वांना हाक दिली व घराबाहेर काढले.यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटातच ते ज्या खोलीत झोपले होते, ती खोली पूर्णतः जमीन दोस्त झाली. सुदैवाने त्यांनी सर्वांना हाक दिली व घराबाहेर काढले. कुठलीही हानी झाली नाही. मात्र त्यांचे पूर्ण घर उध्वस्त झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.