ETV Bharat / city

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 55 टक्के जलसाठा - uppar wardha dam

पश्चिम विदर्भात लहान मोठे असे एकूण 511 धरण आहेत. गेल्या वर्षी या प्रकल्पांत याच कालावधीतील जलसाठा 48 टक्के इतका होता. यंदा हा जलसाठा 46 टक्क्यांवर आला आहे.

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 55 टक्के जलसाठा

author img

By

Published : Mar 12, 2021, 12:05 PM IST

अमरावती : सध्या राज्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम विदर्भातही पारा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरवात झाली आहे. पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्पांतील पाणी पातळी वाढत्या उष्णतेमुळे कमी होत आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अमरावतीतील अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा यंदा मार्च महिन्यातच 55 टक्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा जलसाठा 65 टक्क्यांवर होता.

अप्पर वर्धा धरणात सध्या 55 टक्के जलसाठा
पश्चिम विदर्भातील प्रकल्पांत 46 टक्के जलसाठापश्चिम विदर्भात लहान मोठे असे एकूण 511 धरण आहेत. गेल्या वर्षी या प्रकल्पांत याच कालावधीतील जलसाठा 48 टक्के इतका होता. यंदा हा जलसाठा 46 टक्क्यांवर आला आहे. पश्चिम विदर्भात एकूण 9 मोठे पाणी प्रकल्प आहेत. यातील सर्वांत मोठा प्रकल्प हा अप्पर वर्धा आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3 मोठे प्रकल्प आहेत. अकोला जिल्ह्यात 2 तर बुलडाणा जिल्ह्यात 3 मोठे प्रकल्प आहेत.पाणी कपात नाहीअमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातून संपूर्ण अमरावती शहराला पाणी पुरवठा केला जातो. पाणी साठ्यात घट झाली की अमरावती शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाते. मात्र यंदा धरणात 55 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने सध्या तरी पाणी कपात होणार नसल्याची चिन्हे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.