नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा व वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडी व पडवळच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. ( Vegetables Rate Today )
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ६५०० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपयेपडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये. ( Vegetables Rate Today in APMC Market )
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३८०० रुपये.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १६०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये १००० रुपये.