मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. ( Petrol Diesel Rates ) अशात केंद्र सरकारने ( Central Government )आणि राज्य सरकारने इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. केंद्राने पेट्रोलवरील अबकारी कर 8 रुपयांनी कमी केले तर डिझलवरील कर 6 रुपयांनी कमी केले, त्यामुळे पेट्रोलचे दर हे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. ( Petrol Diesel Rates ) तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील कर कपात केली आहे. त्यामुळे, थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. ( Petrol Diesel Rates ) काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर दिसून आले आहे. पहा राज्यातील आजचे दर.
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -
आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर रुपये) | कालचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर रुपये) | |
मुंबई | 111.35 | 111.35 |
पुणे | 111.19 | 110.98 |
नाशिक | 111.74 | 111.39 |
नागपूर | 111.08 | 111.07 |
कोल्हापूर | 111.44 | 111.72 |
औरंगाबाद | 111.48 | 113.03 |
सोलापूर | 111.69 | 112.03 |
अमरावती | 112.41 | 111.77 |
ठाणे | 111.42 | 111.49 |
महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर -
आजचे डिझेलचे दर (प्रति लिटर रुपये) | कालचे डिझेलचे दर (प्रति लिटर रुपये) | |
मुंबई | 97.28 | 97.28 |
पुणे | 95.66 | 95.46 |
नाशिक | 96.20 | 95.86 |
नागपूर | 95.59 | 95.58 |
कोल्हापूर | 95.94 | 96.21 |
औरंगाबाद | 95.95 | 97.41 |
सोलापूर | 96.17 | 96.49 |
अमरावती | 96.87 | 96.26 |
ठाणे | 97.35 | 97.42 |
हेही वाचा - Todays Gold Rates : सोने- चांदीच्या दरात काही शहरांमध्ये वाढ.. तर काही शहरांमध्ये दर स्थिर.. पहा आजचे दर