मुंबई: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत.दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
पेट्रोल आणि डिझेल दर: नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 07 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 70 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 23 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 07 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 65 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 37 पैसे आहे.
डायनॅमिक इंधन किंमत प्रणाली: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत.
आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम: इंधनाच्या किंमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आहे. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत.
हेही वाचा: Today Petrol Diesel Rates पेट्रोलडिझेल झाले का स्वस्त आजचे दर घ्या जाणून