मुंबई : आखाती देशांकडून भारत कच्चे तेल आयात करतो. यात इराण, सौदी अरेबीया, इराक अशा इतर देशांचा समावेश आहे. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. यावर उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर खर्च जोडून हे दर ग्राहकांना पेट्रोल पंपावर दिसतात. वाढत्या महागाईत क्रूड ऑइलचे दर वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीही काहीशी वाढ होईल असा अंदाज आहे. आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू या. जागतिक बाजारात शनिवारी कच्च्या तेलाच्या दरात स्थिरता पहायला मिळाली. शनिवारी डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या दरात 1.22 टक्क्यांची वृद्धी झाली. म्हणजे 81.31 डॉलर प्रति बॅरलवर दर आला. देशातील तेल कंपन्यांनी देखील पेट्रोल डिझेलच्या दरात बदल केला आहे.
तुमच्या शहरांतील आजचे दर : देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात अगदी किंचीतसा बदल झाला आहे. पहा तुमच्या शहरांतील आजचे दर काय आहेत. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 33 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 33 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 37 पैसे आहे.
पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत : भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या म्हणून ओळखल्या जातात. तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेणे गरजेचे असते. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवण्यात येते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल करण्यात येतो. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते.
हेही वाचा : Today Petrol Diesel Rates: आज पेट्रोल स्वस्त की महाग? पहा तुमच्या शहरांतील आजचे दर