ETV Bharat / business

Rupee Breaks 39 Paise : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 39 पैशांनी घसरला; 82.69 या सर्वात नीचांकी पातळीवर पोहचला

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती ( Rupee Breaks Down in 39 Paise ) आणि गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेत गुंतवणूकीतून माघार घेतली ( Forex Exchange Market ) आहे. या सर्व कारणांनी डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी 39 पैशांनी ( Rupee Falls to All Time Low ) घसरून 82.69 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला आहे.

author img

By

Published : Oct 10, 2022, 1:28 PM IST

Rupee Breaks 39 Paise Against US Dollar
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 39 पैशांनी घसरला

मुंबई : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आहेत. तसेच गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेमधून माघार घेतल्याने सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 39 पैशांनी ( Rupee Breaks Down in 39 Paise ) घसरून 82.69 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर ( Forex Exchange Market ) आला. याशिवाय देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण ( Rupee Falls to All Time Low ) आणि अमेरिकन चलन मजबूत झाल्यामुळे रुपयावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 82.68 वर उघडला आणि नंतर 82.69 पर्यंत घसरला. मागील बंद किंमतीच्या तुलनेत 39 पैशांची घसरण दर्शवित आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी घसरून 82.30 वर बंद झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले की, भारताचा परकीय चलन साठा 30 सप्टेंबर रोजी डॉलर 4.854 अब्ज डॉलरने घसरून डॉलर 532.664 अब्ज झाला आहे.

दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर निर्देशांक 0.02 टक्क्यांनी वाढून 112.81 वर पोहोचला. जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.87 टक्क्यांनी घसरून डॉलर 97.07 प्रति बॅरलवर आला. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ 2,250.77 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.