नवी दिल्ली - देशात किरकोळ बाजारपेठेत महागाईने कळस गाठला आहे. मार्चमध्ये महागाईचे प्रमाण हे 6.95 टक्के ( retail market inflation ) राहिले आहे. ही महागाई गेल्या सतरा महिन्यांतील सर्वाधिक आहे. हे महागाईचे प्रमाण आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेहून ( RBI limit for retail inflation ) अधिक आहे.
सलग तिसऱ्या तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचे प्रमाण ( Consumer Price Index inflation ) हे 6 टक्क्यांहून अधिक आहे. यापूर्वी मोदी सरकारच्या काळात ऑक्टोबर 2020 मध्ये महागाईचे सर्वाधिक प्रमाण हे 7.61 एवढे नोंदविण्यात ( highest retail market inflation ) आलेले आहे. मार्च 2022 मध्ये अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे 7.68 टक्के राहिले ( food inflation in March 2022 ) आहे. तर फेब्रुवारी 2022 मध्ये अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे 5.85 टक्के राहिले आहे.
महागाईकरिता 4 टक्क्यांची मर्यादा- मार्च 2022 मध्ये किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण हे 5.52 टक्के राहिले आहे. तर अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे 4.87 टक्के राहिले आहे. आरबीआयने किरकोळ बाजारपेठेत महागाईकरिता 4 टक्क्यांची मर्यादा निश्चित केली आहे. प्रत्यक्षात किरकोळ बाजारपेठेत जानेवारी ते मार्च दरम्यान महागाईचे प्रमाण हे 6.34 टक्के राहिले आहे.
फेब्रुवारीमध्ये महागाईचे प्रमाण 8.73 टक्के - राष्ट्रीय सांख्यिकी आयोग्याच्या आकडेवारीनुसार (NSO on food inflation ) तेल आणि फॅट यामधील महागाईचे प्रमाण हे 18.79 टक्क्यांनी वाढले आहे. भूराजकीय कारणांनी खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. युक्रेनमुळे सुर्यफुलाच्या किमती वाढल्या आहेत. पालेभाज्यांमधील महागाईचे प्रमाण हे मार्चमध्ये 11.64 टक्क्यांनी वाढले आहे. मांस आणि माश्यांमधील महागाईचे प्रमाण 9.63 टक्के राहिले आहे. असे असले तरी इंधन आणि वीजेमधील महागाईचे प्रमाण हे कमी होऊन 7.52 टक्के झाले आहे. फेब्रुवारीमध्ये हे महागाईचे प्रमाण 8.73 टक्के होते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मागील तिमाही पतधोरणात महागाईचे प्रमाण 5.7 टक्के राहिल असा अंदाज केला आहे.
हेही वाचा-Skymet weather Forecasts Normal : 2022 मध्ये मान्सूनची स्थिती सर्वसाधारण राहिलृ स्कायमेटचा अंदाज
हेही वाचा-Andhra Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वेखाली चिरडून पाच जणांचा मृत्यू