मुंबई : क्रिप्टो बाजार शुक्रवारी सलग लाल रंगात व्यवहार करत होता. बिटकॉइन 3.4 टक्क्यांवरून घसरून 21,860 डॉलरवर आला होता. तर इथेरिअम 1,550 डॉलरच्या खाली होता. शनिवारी बिटकॉईनचे व्हॉल्यूम 6.97 टक्क्यांनी वाढून 30.86 अब्ज डॉलर झाले. त्याचे मार्केट कॅप सुमारे 41.46 टक्क्यांच्या वर्चस्वासह सुमारे 421.65 अब्ज डॉलर होते. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत 0.46 टक्के मूल्य गमावले आहे. जे 21,690.72 डॉलरवर व्यापार करत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ते 7.07 टक्क्यांनी कमी आहे. इथेरिअम दुसरे सर्वात लोकप्रिय टोकन आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 1.19 टक्क्यांनी खाली आहे. आता ते 1,520.10 डॉलरवर व्यापार करत होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ते 8.03 टक्क्यांनी कमी आहे. बिटकॉईऩ आणि इथेरिअमचे बाजार भांडवल अनुक्रमे 418.40 अब्ज डॉलर आणि 186.05 अब्ज डॉलर आहे.
क्रिप्टोकरन्सीचे मागील काही दिवसांचे दर : 9 फेब्रुवारी रोजी बीटकॉइनची किंमत 19,00,300.36 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,36,557.38 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,952.07 रूपये होती. तेच 8 फेब्रुवारी रोजी रोजी हीच बीटकॉइनची किंमत 19,31,388.16 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,39,797.33 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,100 रूपये होती. तर 7 फेब्रुवारी रोजी हीच बीटकॉइनची किंमत 18,85,220.24 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,33,958.24 रूपये होती. बायनान्सची किंमत 25,454.60 रूपये होती.
बिटकॉईन म्हणजे काय : बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असते. फक्त ते ऑनलाईन असते आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेले असते. जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात, तसेच इथेही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येते. ही खरेदी केल्यावर तुमचे एक वॉलेट तयार होते, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल. 2017 पर्यंत जगभरातल्या एक लाखांहून अधिक सुपरमार्केट चेन्स आणि मोठ्या दुकानदारांनी बिटकॉईनमध्ये व्यवहारांना मान्यता दिली होती.
हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग