ETV Bharat / business

Digital Rupee: सर्वसामान्यांना वापरता येईल डिजिटल रुपया, कसा कराल वापर?

Digital Rupee: RBI 1 डिसेंबर रोजी डिजिटल रुपयाच्या किरकोळ वापराशी संबंधित पहिली पायलट चाचणी घेणार आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया आणण्याची घोषणा केली होती.

author img

By

Published : Dec 2, 2022, 9:44 AM IST

Digital Rupee
Digital Rupee

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 डिसेंबर रोजी डिजिटल रुपयाच्या किरकोळ वापराशी संबंधित पहिली पायलट चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये 4 सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचा सहभाग असणार आहे.

मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, आरबीआयने केंद्रीय बँक डिजिटल चलनाच्या किरकोळ वापरासाठी प्रायोगिक चाचणीची घोषणा केली आहे. आरबीआयने सांगितले होते, की 1 डिसेंबर रोजी ही चाचणी क्लोज्ड यूजर ग्रुप (CUG) मधील निवडक ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये ग्राहक आणि बँक व्यापारी दोघांचाही समावेश असणार आहे. याआधी सेंट्रल बँकेने डिजिटल रुपयाच्या घाऊक सेगमेंटला पायलट केले आहे. डिजिटल रुपयाच्या घाऊक सेगमेंटची पहिली प्रायोगिक चाचणी 1 नोव्हेंबर रोजी झाली.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेसह ४ बँका डिजिटल रुपयाच्या किरकोळ वापराच्या या चाचणीत सहभागी होणार आहेत. ही चाचणी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथे होणार आहे. आरबीआयने सांगितले की, इलेक्ट्रॉनिक रुपया डिजिटल टोकनच्या स्वरूपात असणार आहे. जे वैध चलन दर्शवते. यावेळी जारी केल्या जाणाऱ्या कागदी चलनाच्या आणि नाण्यांच्या सध्याच्या आकारात ते जारी केले जाणार आहे.

डिजिटल रुपयाचे वितरण बँकांमार्फत केले जाईल आणि वापरकर्ते प्रायोगिक चाचणीत सहभागी होणाऱ्या बँकांनी ऑफर केलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे ई-रुपीमध्ये व्यवहार करू शकतील. हा व्यवहार P2P आणि P2M दोन्ही करता येतो. आरबीआयने सांगितले की, हा डिजिटल रुपया पारंपरिक रोख चलनाप्रमाणेच धारकाला विश्वास, सुरक्षितता आणि अंतिम समाधान या गुणांनी सुसज्ज असणार आहे. आरबीआयने म्हटले आहे की, कॅशप्रमाणेच डिजिटल रुपयाच्या धारकाला कोणतेही व्याज मिळणार नाही, आणि त्याचा वापर बँकांमध्ये ठेवींसाठी करता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.