मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. (Petrol Rates ) साहजिकच इंधनाच्या दरातही होणारी रोजची वाढ आता खिशाला जड होत आहे. नाशिक, मुंबई, नागपूर आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किंमती (Petrol diesel rate today) जाहीर करण्यात आल्या आहेत.
इंधनाच्या किंमती : इंधनाच्या किमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो (Petrol Diesel Rate Today in Maharashtra) आहे.
इंधन दरवाढीचा फटका : मार्च 2020 पासून जगभरात लागलेल्या कडक लॉकडाऊनमुळे तेलाची आंतरराष्ट्रीय मागणी अचानक कमी होऊन तेलाचे दरही अक्षरश: कोसळले होते. त्या परिस्थितीत भारतात मात्र सलग 82 दिवस तेल कंपन्यांनी इंधनांचे दर स्थिर ठेवले. आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढत असताना देशातले करही वाढून पुन्हा इंधन दरवाढीचा डबल फटका ग्राहकांना बसतो ( Petrol diesel rate today 3 january 2023 ) आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 25 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 03 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे, अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 13 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 29 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 88 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 48 पैसे (Petrol Diesel Rate in Maharashtra) आहे.