नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले, की वस्तू आणि सेवा कर (GST) ने मागील सरकारच्या तुलनेत कमी करण्यात आले आहेत. जीएसटीमुळे राज्य आणि केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्तपन्नात वाढ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. त्या जीएसटी दिवस 2023 कार्यक्रमात बोलत होत्या.
राहुल गांधींवर निशाणा : काँग्रेसचे नेते जीएसटीला 'गब्बर सिंग' कर म्हणून सतत टीका करतात. त्यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींचे ते विधान लाजिरवाणे असल्याची टीका. जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. केसांचे तेल, टूथपेस्ट, साबण, परफ्यूम आणि डिटर्जंटवरील सरासरी कराचा बोजा जीएसटीपूर्वी सुमारे 28 टक्के होता. हा जीएसटी 18 टक्के करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सामान्यांच्या फायद्यासाठी अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू आणि सेवांना जीएसटीमधून सूट दिल्याचे त्यांनी सांगितले.
-
When taxes are paid, a Nation is made: Positive trend in average monthly #GST revenue.#6YearsofGST #GSTforGrowth #LeveragingTechnology #EaseofDoingBusiness #TaxReforms pic.twitter.com/XTIpZXvb15
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">When taxes are paid, a Nation is made: Positive trend in average monthly #GST revenue.#6YearsofGST #GSTforGrowth #LeveragingTechnology #EaseofDoingBusiness #TaxReforms pic.twitter.com/XTIpZXvb15
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 1, 2023When taxes are paid, a Nation is made: Positive trend in average monthly #GST revenue.#6YearsofGST #GSTforGrowth #LeveragingTechnology #EaseofDoingBusiness #TaxReforms pic.twitter.com/XTIpZXvb15
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 1, 2023
अर्थमंत्र्यांकडून प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे कौतुक- जून २०२३ मध्ये जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढून 1.61 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून, चौथ्यांदा देशातील कर संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2021-22 मध्ये जीएसटी संकलन 1.10 लाख कोटी रुपये, 2022-23 मध्ये 1.51 लाख कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये जीएसटी संकल 1.69 लाख कोटी रुपये झाले आहे. समर्पण, वचनबद्धता आणि संयम याबद्दल प्राप्तिकर अधिकार्यांचे अभिनंदन अशा शब्दात अर्थमंत्र्यांनी कौतुक केले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) चे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले की व्यापक अर्थव्यवस्था आणि करदात्यांना जीएसटीचे फायदे होत असल्याचे म्हटले आहे.
सलग चौथ्या महिन्यात जीएसटीचे संकलन 1.50 लाख कोटीहून अधिक: सलग चौथा महिन्यात जीएसटीचे संकलन 1.50 लाख कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने माहिती दिली. यावरून देशातील सर्व राज्यांमध्ये चांगली आर्थिक कामगिरी होत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मे 2022 मध्ये जीएसटी संकलन 1.41 लाख कोटी रुपये होते. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता. मार्चमध्ये जीएसटी संकल 1.60 लाख कोटी रुपये होते. सलग 15 व्या महिन्यात 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी संकलन झाले आहे.
हेही वाचा-