मुंबई Muhurat Trading : भारतात आज (रविवार, १२ नोव्हेंबर) दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिवाळीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी सकाळी शेअर बाजार बंद असतो. मात्र संध्याकाळी विशिष्ट मुहूर्तावर तो एका तासासाठी उघडल्या जातो. याला 'मुहूर्त ट्रेडिंग' असं म्हटलं जातं.
-
#WATCH | Mumbai: 'Muhurat Trading' at Bombay Stock Exchange (BSE); Dinanath Dubhashi, Managing Director & CEO at L&T Finance Holdings Ltd present as the chief guest on the occasion. pic.twitter.com/irqkcyRCI4
— ANI (@ANI) November 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Mumbai: 'Muhurat Trading' at Bombay Stock Exchange (BSE); Dinanath Dubhashi, Managing Director & CEO at L&T Finance Holdings Ltd present as the chief guest on the occasion. pic.twitter.com/irqkcyRCI4
— ANI (@ANI) November 12, 2023#WATCH | Mumbai: 'Muhurat Trading' at Bombay Stock Exchange (BSE); Dinanath Dubhashi, Managing Director & CEO at L&T Finance Holdings Ltd present as the chief guest on the occasion. pic.twitter.com/irqkcyRCI4
— ANI (@ANI) November 12, 2023
सेन्सेक्स ३६६.८६ अंकांनी वधारला : दरम्यान, मुंबईचा शेअर बाजार रविवारी संध्याकाळी एका तासासाठी खुला करण्यात आला. सायंकाळी ६.१५ वाजता 'मुहूर्त ट्रेडिंग' सुरू झालं. दिवाळीला 'मुहूर्त ट्रेडिंग' सुरू होताच सेन्सेक्स ३६६.८६ अंकांनी वधारला. शेअर बाजार एकूण एक तास म्हणजे ७.१५ पर्यंत चालला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) नं गेल्या महिन्यात दिवाळीच्या वेळी 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्र आयोजित करण्याची घोषणा केली होती. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एल अॅंड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दीनानाथ दुभाषी उपस्थित होते.
१९५७ पासून ट्रेंड सुरू आहे : दिवाळीचा काळ हा काही नवीन सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. या विश्वासाला अनुसरुन गुंतवणूकदार या एक तासाच्या मुहूर्ताला खूप महत्त्व देतात. या कालावधीत केलेले व्यवहार बाजारासाठी एक समृद्ध वर्ष घेऊन येतील असा विश्वास आहे. तसेच, या काळात स्टॉक खरेदी केल्यास वर्षभर नफा मिळतो, असाही विश्वास आहे. दिवाळीच्या काळात 'मुहूर्त ट्रेडिंग' चा हा ट्रेंड १९५७ पासून सुरू आहे. या एक तासाच्या मुहूर्तादरम्यान गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करतात. शिवाय, शेअर बाजाराशी संबंधित व्यापारी या दिवशी नवीन खाती उघडतात.
हेही वाचा :