ETV Bharat / business

Mudra Loan online apply : काय आहे मुद्रा लोन; जाणून घ्या कसा करावा अर्ज... - बँकांकडून कर्ज

Mudra Loan online apply : मुद्रा योजनेअंतर्गत स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज सहज करू शकता.

Mudra Loan online apply
मुद्रा लोन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 7:47 PM IST

हैदराबाद Mudra Loan online apply : तुम्ही व्यापारी आहात आणि तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे का? तुम्ही व्यावसायिक आहात आणि स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत आहात? भांडवलाअभावी तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नसाल तर आजच मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करून हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता.

एक लोकप्रिय योजना : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही भारत सरकारची लहान व्यावसायिकांना बँकांकडून कर्ज ( Bank Loan ) उपलब्ध करून देणारी एक लोकप्रिय योजना आहे. त्याला मुद्रा लोन असंही म्हणतात. 2019-2020 या आर्थिक वर्षात 6 कोटी 22 लाखांहून अधिक व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुद्रा योजनेत महिलांना प्राधान्य दिलं जातं. या योजनेअंतर्गत, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, बिगर बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) आणि मायक्रो फायनान्स संस्थांना (MFIs) 25 bps कमी व्याजदराने कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत 3 श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते:

  • शिशु : ₹५०,००० पर्यंत
  • किशोर : ₹50,000 ते ₹5 लाख
  • तरुण : ₹5 लाख ते ₹10 लाख

व्यवसायांसाठी श्रेणी अंतर्गत कर्ज : व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तरुण वर्गात साधारणपणे कर्ज दिलं जातं. त्याचवेळी कमी भांडवलानं सुरू होणाऱ्या व्यवसायांसाठी शिशु श्रेणी अंतर्गत कर्ज दिलं जाते. मुद्रा कर्जावरील व्याज दर आणि अटी प्रत्येक बँकेत बदलू शकतात. SBIचा व्याजदर किमान 9.75 टक्के आहे. तर पीएनबीचा दर 9.60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कर्ज तीन ते पाच वर्षांत ईएमआय स्वरूपात बँकांना परत करावं लागेल. व्याज दर किंवा ईएमआय कालावधी व्यवसायाच्या मागील क्रेडिट आणि उलाढालीनुसार ठरवला जातो.

मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा : कर्जासाठी अर्ज सरकारी, खासगी, परदेशी, सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या जवळच्या शाखेत तसंच NBFC किंवा MFIs मध्ये केले जाऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. ज्या बँकेत तुमचं आधीच खातं आहे, त्याच बँकेत तुम्ही कर्जासाठी अर्ज करावा. तुम्ही मुद्रा लोन वेबसाइटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकता.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : वेगवेगळ्या बँकांना अर्जासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असते. बँक अधिकारी तुमच्याकडून या कागदपत्रांची मागणी करू शकतात.

  • व्यवसायाची योजना
  • पूर्णपणे भरलेला अर्ज
  • अर्जदाराचा फोटो
  • ओळखीचा पुरावा (आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स सारखी कागदपत्रे)
  • राहण्याचा पुरावा (आधार, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, बँक पासबुक सारखी कागदपत्रे)
  • उत्पन्नाचा पुरावा (आयटीआर, विक्रीकर रिटर्न सारखी कागदपत्रे)
  • इतर गरजेची केवायसी कागदपत्रे

हेही वाचा :

  1. Apply for Student visa : अभ्यासासाठी परदेशात जायचयं ? असा करा व्हिसासाठी अर्ज
  2. PF Withdrawal : तुम्ही घरी बसून काढू शकता ईपीएफचे पैसे; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया....
  3. Lock and unlock Aadhar service : तुम्हीही करू शकता तुमचं आधार कार्ड लॉक आणि अनलॉक; कसं ते घ्या जाणून...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.