बुलढाणा : भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra ) आज सकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील नीमखेडी येथून कारने निघाली. जंगलाचा रस्ता असल्याने राहुल गांधीसह इतर लोक सुद्धा गाडीने प्रवास करत असून ही यात्रा मध्यप्रदेशचा बोदर्ली येथ पोहचणार आहे. तिथून पायी प्रवास करणार आहे. भारत जोडो यात्रा ही सोळा दिवसाच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडी येथून निघाली. ही यात्रा 20 नोव्हेंबरला जाणार होती. मात्र खासदार राहुल गांधी हे प्रचारासाठी गुजरातला गेल्याने दोन दिवस यात्रा निमखेडी येथे मुक्कामाला होती. आज सकाळी भारत जोडो यात्रा येथून निघाली असून मध्यप्रदेशला पोहचेल. ( Rahul Gandhis Bharat Jodo Yatra in nimkhedi )
पदयात्रेचा संदेश : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील यात्रेच्या कळमनुरी येथे जाहीर सभेला संबोधित केले आणि म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेचा संदेश आहे. भारताचे विभाजन होऊ शकत नाही आणि द्वेष होता कामा नये. पसरण्याची परवानगी आहे. त्याचवेळी, वेदांत-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्याबद्दलही काँग्रेस नेत्याने राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा ( Rahul Gandhis Bharat Jodo Yatra in nimkhedi ) साधला.