मुंबई : बिटकॉइन हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.आज बिटकॉइनची किंमत 18,63,568 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,31,922 रूपये आहे. बायनान्सची किंमत 81.70 रूपये आहे. बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे.
क्रिप्टोकरन्सी दर : बिटकॉइन आजच्या काळात खूप लोकप्रिय होत आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा बिटकॉइनला जास्त किंमत नव्हती. पण आज प्रत्येक व्यक्ती बिटकॉइन खरेदी करण्यासाठी इच्छुक आहे. पण बिटकॉइन कसे खरेदी करायचे? तसेच बिटकॉइन कसे काम करते. त्यासोबत बिटकॉइनचे फायदे आणि तोटे काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज जाणून घेवू या.
क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? : अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी. म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखे नसते. कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन छापत नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. जशी जगभरात रुपया, डॉलर, युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत. तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करते. यातली बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी साधारण दशकभरापूर्वी लाँच करण्यात आली होती.
पीयर टू पीयर नेटवर्क : बिटकॉइन एक विकेंद्रित करन्सी म्हणून ओळखली जाते. कारण ह्या करंसीला कंट्रोल करण्यासाठी कोणतीही अथॉरिटी, गवर्नमेंट किंवा बँकेची गरज पडत नाही. बिटकॉइन ही करंसी पीयर टू पीयर नेटवर्कवर काम करते. म्हणजे कधी कोणत्या व्यक्तीला बिटकॉइन खरेदी करायचे असेल, तेव्हा तो व्यक्ती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यांच्या माध्यमातून सरळ ट्रांझिक्शन करू शकतो. बिटकॉइनचा आविष्कार संतोषी नाकामोतो याने 2009 मध्ये केला होता. तसेच तेव्हा पासून लोकं बिटकॉइनचा वापर खूप प्रमाणात करत आहेत.
हेही वाचा : Today Cryptocurrency Prices बिटकॉईन म्हणजे काय जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर