ETV Bharat / business

Indian Stock Market : सेन्सेक्स 600 अंकांवर तर निफ्टी 17,100 च्या पुढे, RIL, Infosys, SBI Life तेजीत - आशियातील इतर बाजार अपडेट्स

देशांतर्गत शेअर बाजारात ( Domestic stock market ) शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहिली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 619 अंकांची वाढ करून 57,000 चा टप्पा पार केला.

Indian Stock Market
Indian Stock Market
author img

By

Published : Jul 29, 2022, 1:44 PM IST

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी ( Domestic stock market ) सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहिली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 619 अंकांची वाढ ( Sensex up 619 points ) करून 57,000 चा टप्पा पार केला. तीस कंपन्यांचा समावेश असलेला BSE सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 619.27 अंकांनी वाढून 57,477.06 अंकांवर ( BSE Sensex Reached 57,477.06 points ) पोहोचला.

त्याचप्रमाणे NSE चा मानक निर्देशांक निफ्टी देखील 189.15 अंकांच्या वाढीसह 17,118.75 अंकांवर ( Nifty at 17,118.75 points ) व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, मारुती सुझुकी, इन्फोसिस, पॉवर ग्रिड आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज आणि सन फार्मा यांचे शेअर्स तोट्यात होते.

आशियातील इतर बाजारांमध्ये ( Other markets in Asia ), सोल आणि टोकियोचे निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते, जरी शांघाय आणि हाँगकाँगचे बाजार तोट्यात होते. एक दिवस आधी, गुरुवारी, अमेरिकन बाजार देखील वाढीसह बंद झाले. मागील सत्रात, बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स गुरुवारी 1,041.47 अंकांनी किंवा 1.87 टक्क्यांनी वाढून 56,857.79 वर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 287.80 अंकांनी म्हणजेच 1.73 टक्क्यांनी वाढून 16,929.60 वर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड ( International Oil Standard Brent Crude ) 0.02 टक्क्यांनी घसरून 107.12 डॉलर प्रति बॅरलवर आले. उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी गुरुवारी 1,637.69 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हेही वाचा - Petrol Diesel Rates : पेट्रोल-डिझेलच्या दरात अल्पसा चढउतार, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहेत इंधनाचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.