ETV Bharat / business

Direct Tax Collection Increased: पैसेच पैसे.. देशातील प्रत्यक्ष कर संकलनात 24 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत 15 लाख कोटींची बक्कळ कमाई.. - आयकर

देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाली आहे. देशातील करदात्यांनी 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्वाधिक कर भरण्याचा विक्रम केला आहे. यासह सरकारने कर संकलनात नवा विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 24 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

gross direct tax collection increased by 24 percent to rs 15.67 lakh crore
देशातील प्रत्यक्ष कर संकलनात 24 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत 15 लाख कोटींची बक्कळ कमाई..
author img

By

Published : Feb 11, 2023, 5:59 PM IST

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 24 टक्क्यांनी वाढून 15.67 लाख कोटी रुपये झाले असल्याचे अर्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितले. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शनिवारी म्हटले की, 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत त्यांचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 12.98 लाख कोटी रुपये आहे. जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा 18.40 टक्के अधिक आहे.

आयकर संकलन २९ टक्क्यांनी वाढले: अर्थमंत्रालयाने जारी केलेले हे कर संकलनाचे आकडे 10 फेब्रुवारी 2023 पर्यंतचे आहेत. एप्रिल 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कॉर्पोरेट आयकराचा वाढीचा दर 19.33 टक्के असल्याचेही मंत्रालयाने सांगितले. तर एकूण वैयक्तिक आयकर संकलन 29.63 टक्क्यांनी वाढले आहे. हा आकडा कर परताव्याच्या समायोजनानंतरचा असल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे.

सरकारला 15.67 लाख कोटी रुपये मिळाले: चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाशी संबंधित सुधारित अंदाजपत्रकाच्या अंदाजे 79 टक्के रक्कम आतापर्यंत जमा झाली आहे. सुधारित अंदाज सुमारे 16.50 लाख कोटी रुपये ठेवण्यात आला आहे, जो 14.20 लाख कोटी रुपयांच्या बजेट अंदाजापेक्षा जास्त आहे. CBDT च्या विधानानुसार, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 15.67 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा 24.09 टक्के अधिक आहे.

प्राप्तिकराची मर्यादा यंदा वाढवली: नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादा वाढवण्यात आली आहे. पूर्वी ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न हे प्राप्तिकरापासून मुक्त होते. पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता यंदा केंद्र सरकारने प्राप्तिकरावरील कराची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार यंदाप्राप्तिकराची मर्यादा ५ लेखांवरून ७ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

२.६९ कोटींचा करदात्यांना दिलाय परतावा: 1 एप्रिल 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत 2.69 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 61.58 टक्के जास्त आहे. कराच्या परताव्यासाठीची रक्कम समायोजित केल्यानंतर, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 12.98 लाख कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच जवळपास 18.40 टक्क्यांनी कर संकलन वाढले आहे.

हेही वाचा: Adani vs Hindenburg: हिंडेनबर्गला अमेरिकेच्या कोर्टात खेचणार.. अदानींचा कायदेशीर लढा सुरू.. वकिलांची फौज लावली कामाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.