ETV Bharat / business

बाजारातील अनिश्चिततेच्या काळात सोने हा एक चांगला पर्याय, ICICI प्रुडेन्शियल AMC च्या प्रमुखांचा सल्ला

कोरोना महासाथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून अर्थव्यवस्थेत अनिश्चितता ( Uncertainty in the economy due to Corona pandemic ) आली होती. परिणामी आत्तासुद्धा ही अनिश्चितता गुंतवणूकदारांना सतावत आहे. त्यामुळे या परिस्थितीत आशादायी गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी सोने हा एक चांगला पर्याय ( Gold is a great option for investment seekers ) अनेकांपुढे आहे.

author img

By

Published : Jun 25, 2022, 3:29 PM IST

Updated : Jun 25, 2022, 5:20 PM IST

good-option
good-option

हैदराबाद - कोरोना महासाथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून अर्थव्यवस्थेत अनिश्चितता ( Uncertainty in the economy due to Corona pandemic ) होती. अर्थव्यवस्थेत अनेक चढ-उतार आले होते. कोरोनासह अनेक घटक त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अर्थव्यवस्थेत अनिश्चितेत आता कोरोना महामारी आणि सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संकटाचा समावेश आहे. परिणामी ही अनिश्चितता गुंतवणूकदारांना सतावत आहे. तर दुसरीकडे, शेअर बाजाराच्या निर्देशांकात जोरदार चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे या परिस्थितीत आशादायी गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी सोने हा एक चांगला पर्याय ( Gold is a great option for investment seekers ) अनेकांपुढे आहे.

इतर गुंतवणुकींच्या तुलनेत सोन्याला मोठा परतावा मिळत असतो. संकटकाळात इतर योजनांच्या तुलनेत सोने अधिक चमकत ( Gold investment more helpful than other schemes ) असते. त्याुमळेच चलनाचे मूल्य कितीही असो, जगभरातील सर्वच देशांमध्ये सोन्याला मागणी आहे. सोन्याच्या मर्यादित पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर चलनाचे मूल्य ठरत नाही आणि त्याचे मूल्य कमी होत नाही. जेव्हा जगभरात कोणतेही नकारात्मक परिणाम होतात.. तेव्हा सोन्याचे भाव वाढलेले दिसतात. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या किंमतीत वाढच पहायला मिळत आहे.

गुंतवणुकीत विविधता राखण्यासाठी रोख गुंतवणूक आवश्यक असते. वाटप एकूण पोर्टफोलिओच्या 5-10% पेक्षा कमी असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. गरजेनुसार दागिन्यांच्या स्वरूपात आपण सोने खरेदी करत असते. मात्र, भविष्याच्या दृष्टीने तुम्ही गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड्सची निवड करू शकता. सार्वभौम रोख रोख्यांमध्ये गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांसाठी व्याजही मिळते आणि त्या गुंतवणुकीत वाढ होण्याची संधी देखील असते.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) थेट सोने खरेदी करण्याची गरज सुलभ करतात. हे देशांतर्गत सोन्याच्या किमतींशी निगडीत आहेत. म्हणून, जेव्हा तुम्ही ETF मध्ये गुंतवणूक करता तेव्हा ती गुंतवणुक केली असल्याचे मानले पाहिजे. त्यामुळे सुरक्षेची काळजी करण्याची गरज राहत नाही. एका युनिटची किंमत एक ग्रॅम सोन्याच्या बरोबरीची आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी अधिक गुंतवणूक करावी लागते. त्याव्यतिरिक्त तुम्ही गोल्ड फंड्सची निवड करू शकता. ते नियमित म्युच्युअल फंडाप्रमाणे काम करते. तुम्ही त्यात किमान १०० रुपयांच्या गुंतवणूकीची सुरुवात करू शकता. गुंतवणुकीचे वैविध्य, भविष्यातील गोष्टी, विवाह आणि इतर चांगल्या कामांसाठी सोने जमा करण्याचा एक मार्ग म्हणून गोल्ड ईटीएफचा विचार केला जाऊ शकतो असे ICICI प्रुडेन्शियल AMC चे उत्पादन विकास प्रमुख चिंतन हरिया यांनी सांगितले आहे

हेही वाचा - Bitcoin Rate Today : बिटकॉइनच्या दरात किरकोळ अशी वाढ.. इथेरियम, डोज कॉईनच्या किमतीचीही उउतरल्या

Last Updated : Jun 25, 2022, 5:20 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.