ETV Bharat / business

Foxconn Pulls Out JV With Vedanta : फॉक्सकॉनने महाराष्ट्रानंतर गुजरातमधील प्रकल्प गुंडाळला; आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप - वेदांता कंपनीसोबतची भागिदारी संपुष्टात

तैवानची इलेक्ट्रॉनिक्स चिप बनवणारी सुप्रसिद्ध कंपनी फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार रद्द करण्याची घोषणा केली आहे. फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये चिप बनवण्याचे उत्पादन करणार होती, मात्र हा करार रद्द करुन फॉक्सकॉन कंपनीने आपला गाशा गुजरातमधून गुंडाळला आहे. यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकावर टीका केली आहे.

Foxconn Pulls Out JV With Vedanta
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2023, 8:40 AM IST

Updated : Jul 11, 2023, 9:31 AM IST

नवी दिल्ली : फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये वेदांता कंपनीसोबत चिप बनवण्याचे उत्पादन करण्यात गुंतवणूक करणार होती. मात्र कंपनीला कोणीही भागिदार न मिळाल्याने फॉक्सकॉन कंपनीने आपला गाशा गुंडाळण्याचे ठरवले आहे. याबाबत फॉक्सकॉन कंपनीने आपण वेदांता कंपनीसोबतची भागिदारी संपुष्टात आणत असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पावरून महाराष्ट्रात मोठा वादंग निर्माण झाला होता. हा प्रकल्प पुण्यातून गुजरातमध्ये का नेला, आता तरी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

  • "This decision of Foxconn to withdraw from its JV with Vedanta has no impact on India's Semiconductor Fab goals," tweets Union Minister of Electronics and Technology, Rajeev Chandrasekhar. pic.twitter.com/zDASvhv09L

    — ANI (@ANI) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये चिप बनवण्याचे उत्पादन आता करणार नसल्याचे स्पष्ट झाले. फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये 19.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार होती. फॉक्सकॉन ही तैवानची इलेक्ट्रॉनिक्स निर्माता कंपनी मोबाइल फोनपासून रेफ्रिजरेटर आणि कारपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरल्या जाणार्‍या चिप्स बनवण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. हा प्रकल्प अगोदर महाराष्ट्रात येणार होता, मात्र त्यानंतर फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला पळवण्यात आला होता. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन टीका केली आहे. फॉक्सकॉन प्रकल्पा प्रकल्पाला शेवटच्या क्षणी सगळ्यात व्यवहार्य पर्याय होता. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रातून हलवल्याचा मोठा परिणाम झाला आहे. भारताला आणि भारतातील तरूण बेरोजगारांना जागतिक स्तरावरच्या आर्थिक प्रगतीपासून वंचित रहावं लागले. सत्ताधीशांच्या महत्वाकांक्षी क्रूर राजकारणामुळे आणि भेदभावामुळ हे घडले असल्याचे सांगत ठाकरे यांनी मोदी सरकारवर आरोप केला आहे.

  • महाराष्ट्रात पूर्णपणे “feasible” असणारा, पण राजकारणापायी महाराष्ट्राबाहेर पळवला गेलेला 'वेदांता फॅाक्सकॅान' चा प्रकल्प भारतातूनच रद्द होण्याची शक्यता आहे.

    विधानसभेत बेकायदेशीर CM नी मोठी घोषणा करून आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट देऊनही, हा प्रकल्प अत्यंत व्यवहार्य ठिकाण असलेल्या…

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुजरातमध्ये होणार होता प्रकल्प : तैवानची कंपनी असलेली फॉक्सकॉन ही सेमिकंडक्टर चिप बनवण्यासाठी सुप्रसिद्ध असलेली कंपनी आहे. फॉक्सकॉनने वेदांता कंपनीसोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर उत्पादन उभारण्यासाठी करार केला होता. या प्रकल्पावर फॉक्सकॉन कंपनी तब्बल सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. मात्र फॉक्सकॉनने हा करार संपुष्टात आणल्याने ही गुंतवणूक आता होणार नाही. मात्र सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पासाठी वेदांता पूर्णपणे वचनबद्ध आहे. भारतातील पहिला अर्धसंवाहक प्रकल्प उभारण्यासाठी वेदांता कंपनी काही भागीदारांच्या संपर्कात असल्याची माहिती अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या वेदांताने दिली आहे. मात्र त्यांनी आपल्या नवीन भागीदारांची कोणतीही माहिती दिली नाही.

भारत सेमीकंडक्टर उत्पादनाचे नवे केंद्र : भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचे नवे केंद्र बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारत सरकारने अनेक प्रोत्साहन योजनाही सुरू केल्या आहेत. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाव्यतिरिक्त ISMC आणि IGSS व्हेंचर्सकडून अर्ज प्राप्त झाले. परंतु या दिशेने कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सेमीकंडक्टर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमासाठी तंत्रज्ञान भागीदार म्हणून युरोपियन चिप निर्माता STMicroelectronics मध्ये बोलणी सुरू होती. मात्र या कंपनीसोबत कोणताही करार होऊ शकला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादनावर होणार नाही परिणाम : तैवानची चिप बनवणारी कंपनी फॉक्सकॉनने करार रद्द केल्याने भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादनावर परिणाम होणार नसल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली. दोन खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी कोणत्या कारणासाठी भागीदारी केली, हे तपासणे सरकारचे काम नाही. मात्र दोन्ही कंपन्या भारतात त्यांच्या वेगवेगळ्या धोरणांचे पालन करतील असेही राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी स्पष्ट केले. वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्यांची भारतात लक्षणीय गुंतवणूक आहे. या दोन्ही कंपन्या रोजगार वाढीच्या दृष्टीने महत्वाचे गुंतवणूकदार असल्याचेही राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Salesforce News : सेल्सफोर्सचे मोठे पाऊल.. जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्समध्ये 500 दशलक्ष डॉलर करणार गुंतवणूक

Last Updated : Jul 11, 2023, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.