ETV Bharat / business

EPFO Interest Rate : EPFO ​​ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने PF वर मिळणारा व्याजदर वाढवला - EPFO for 2022 23

केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत ठेवींवर 8.15 टक्के व्याजदराची पुष्टी केली आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

EPFO
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
author img

By

Published : Jul 24, 2023, 5:59 PM IST

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. ग्राहकांना आता पूर्वीच्या तुलनेत वाढीव व्याजदर मिळणार आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत ठेवींवर 8.15 टक्के व्याजदराची पुष्टी केली आहे.

या आधी 8.10 टक्के व्याजदर होता : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने 28 मार्च 2023 रोजी 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवर 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारे, EPFO ​​ने आपल्या सहा कोटींहून अधिक सदस्यांसाठीच्या व्याजात किरकोळ वाढ केली आहे, जो पूर्वी 8.10 टक्के होता. सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. आता EPFO ​​ची प्रादेशिक कार्यालये ग्राहकांच्या खात्यात व्याज जोडणार आहेत.

ग्राहकांच्या खात्यात व्याज जोडले जाणार : अहवालानुसार, CBT च्या शिफारशीनंतर, व्याजदर वित्त मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात. त्यानंतरच ते EPFO ​​सदस्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. सामान्यत: व्याजदर वित्त मंत्रालयाकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अधिसूचित केला जातो. ग्राहक FY23 च्या अधिसूचनेची वाट पाहत होते. आता EPFO ​​ची प्रादेशिक कार्यालये ग्राहकांच्या खात्यात व्याज जोडणार आहेत. EPFO ने मार्च 2022 मध्ये 2021-22 साठी EPF ठेवींवरील व्याजदर कमी करून 8.10 टक्के केला होता. 1977-78 नंतरचा हा सर्वात कमी व्याजदर होता. त्यावेळी EPF व्याजदर 8 टक्के होता.

लहान बचत योजनांच्या नियमात 1 जुलैपासून बदल : जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे नियम बदलण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार, व्याजदरात 0.30 टक्क्यांनी वाढ केली गेली आहे. तर एका वर्षाच्या एफडीसाठी व्याजदर 6.80 टक्क्याहून वाढवून 6.90 टक्के करण्यात आला आहे. तसेच दोन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व आरडीनंतरच्या 5 वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. UPI In Sri Lanka : आता श्रीलंकेतही करता येणार UPI द्वारे पेमेंट, दोन देशांमध्ये झाला सामंजस्य करार
  2. Highest Average Salary In India : देशात सोलापुरात मिळतो सर्वाधिक पगार? मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांना टाकले मागे
  3. Rules Change From 1 July : 1 जुलैपासून होणार या नियमांत बदल, थेट संबंध आहे तुमच्या खिशाशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.